Maharashtra Rain Update: राज्यात पुढचे ५ दिवस अतिमुसळधार पावसाचे, 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

IMD Alert: राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain UpdateSaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

Maharashtra Weather Update: जुलै महिना अर्धा संपला तरी देखील राज्यात अद्याप चांगला पाऊस (Maharashtra Rainfall) पडला नाही. त्यामुळे बळीराज्यासह सर्वसामान्य जनता चिंतेत आली आहे. एकीकडे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट तर दुसरीकडे सर्वसामान्यांवर पाणीकपातीचे सावट आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. अशामध्ये राज्यात पुढचे पाच दिवस महत्वाचे असणार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Maharashtra Rain Update
Saharanpur Accident News: ओव्हरटेकच्या नादात गेला जीव! भीषण अपघातानंतर कार पेटली; पती -पत्नीसह चौघांचा जळून मृत्यू

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील पाच दिवस अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच पुढील तीन दिवस मुंबईत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाडा वगळता विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, कोकणातील अनेक जिल्ह्यात आज आणि उद्या अतिमुसळधार पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Maharashtra Rain Update
CM Eknath Shinde On Modi Government: २०२४ ला सर्व रेकॅार्ड तुटतील, आम्हाला चिंता नाही; CM शिंदेंना ठाम विश्वास

हवामान खात्याने पुणे, रायगड, पालघर आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात पुन्हा पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काही भागात पाऊस नाही तर काही भागांमध्ये पडणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाला महागला आहे. तर दुसरीकडे धरण क्षेत्रात चांगला पाऊस न झाल्यामुळे धरणामध्ये कमी पाणी जमा झाले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे.

Maharashtra Rain Update
Agra Tourist Beaten CCTV Footage : ताजमहाल पाहायला गेला अन् आयुष्यभरासाठी कटू आठवण घेऊन आला; पर्यटकाला टोळक्याची बेदम मारहाण

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचे राज्यात उशीराने आगमन झाले. मान्सून दाखल झाल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. पण आता पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबई, मुंबई उपनगर आणि नवी मुंबईत देखील मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. तर या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com