Saharanpur Accident News: ओव्हरटेकच्या नादात गेला जीव! भीषण अपघातानंतर कार पेटली; पती -पत्नीसह चौघांचा जळून मृत्यू

Saharanpur Road Accident Today: ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. या धडकेनंतर कारमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली.
Saharanpur Accident News
Saharanpur Accident NewsSaamtv
Published On

Uttar Pradesh Accident News: उत्तरप्रदेशमधू एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात मंगळवारी ट्रक आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेनंतर कारला आग आग लागली ज्यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Accident News)

Saharanpur Accident News
Uddhav Thackeray in Opposition Meeting : उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल, पुढच्या बैठकीचीही व्यासपीठावरुन केली घोषणा

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, रामपूर मणिहरन परिसरातील बायपास महामार्गावरील उड्डाणपुलावर 11.30 वाजता हा भीषण अपघात (Accident) झाला. हरिद्वारहून एक अल्टो कार येत होती. या ठिकाणी महामार्गाच्या एका बाजूला काम सुरू असल्याने दोन्ही बाजूची वाहने एकाच बाजूने बाहेर काढली जात होती.

त्याचवेळी ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. या धडकेनंतर कारमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की कारमधील पती पत्नीसह चौघांचा जळून जागीच मृत्यू झाला.

Saharanpur Accident News
Ulhasnagar Crime News: धक्का लागल्यामुळे टोळक्याकडून जबर मारहाण, उपचारादरम्यान व्यक्तीचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

दरम्यान, उमेश गोयल (70), सुनीता गोयल पत्नी उमेश गोयल (65), अमरीश जिंदाल (55), गीता जिंदाल पत्नी अमरिश जिंदाल (50) अशी मृतांची नावे असून हे सगळे बसंत विहार ज्वालापूर हरिद्वार येथील रहिवासी आहेत.

कारचे दरवाजे कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. तसेच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी या भीषण रस्ता अपघातावर शोक व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com