Uddhav Thackeray in Opposition Meeting : उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल, पुढच्या बैठकीचीही व्यासपीठावरुन केली घोषणा

Opposition Meeting : बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayUddhav Thackeray
Published On

Opposition Meeting : मोदी सरकारविरोधात एकवटलेल्या विरोधकांची दुसरी बैठक बंगळुरु येथे पार पडली. या बैठकीला देशातील २६ पक्षाचे नेते हजर होते. शिवसेना ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत  उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच विरोधकांची तिसरी बैठक मुंबईत होईल, अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरून केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, दुसरी बैठक यशस्वीरित्या पार पडली आहे. हुकूमशाहीविरोधात जनता एकत्र येत आहे. खरगे साहेबांनी आमच्या आघाडीचं नाव सांगितलं. INDIA हे आमचं नाव ठरलं आहे. ज्या भारतासाठी आपण लढत आहोत, त्यालाच पुढे आपण घेऊन जाणार आहोत.

Uddhav Thackeray
Opposition Party Name: यूपीए नव्हे 'INDIA'; विरोधकांच्या आघाडीचे नाव ठरले! काय आहे नेमका अर्थ?

सारा देश आमचं कुटुंब

राजकारणात वेगवेगळ्या विचारधारा असायला हव्यात, यालाच तर लोकशाही म्हणतात. मात्र तरीही आपण एकत्र आलो आहोत, कारण लढाई आपल्या पक्षांची नाही. काही लोकांना असं वाटतंय की आपआपल्या कुटुंबासाठी आम्ही लढल आहोत. तर हो ते बरोबर आहे. कारण सारा देश आमचं कुटुंब आहे. या कुटुंबाला आम्हाला वाचवायचं आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

तुम्ही घाबरू नका आम्ही आहोत

आमची लढाई एका पक्षाविरोधात किंवा व्यक्तिविरोधात नाही. ही लढाई हुकूमशाहीविरोधात आणि त्या नितीविरोधात आहे. एका काळात स्वातंत्र्यासाठी लढाई झाली होती. आता स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. पण आम्ही आता स्वातंत्र्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास आहे. लोकांमध्ये भीती आहे पण आम्ही आहोत. मैं हूँ ना... तुम्ही घाबरू नका आम्ही आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

Uddhav Thackeray
Opposition Meeting in Bengaluru : सत्ता किंवा पंतप्रधानपदामध्ये काडीमात्र रस नाही; काँग्रेसची स्पष्ट भूमिका

पुढील बैठक मुंबईत

दोन बैठका यशस्वी झाल्या आहेत. पुढची बैठक महाराष्ट्रात मुंबईत होईल. तारीख निश्चित करू, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com