Opposition Party Name: यूपीए नव्हे 'INDIA'; विरोधकांच्या आघाडीचे नाव ठरले! काय आहे नेमका अर्थ?

आजच बेंगळूरमध्ये विरोधी पक्षांची दुसरी बैठक पार पडत आहे. ज्यामध्ये २६ पक्षाचे नेते हजर होते.
Opposition Party Meeting
Opposition Party Meeting Saamtv
Published On

प्रमोद जगताप, प्रतिनिधी...

Opposition Party Meeting Bengluru: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकांसाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी कंबर कसली आहे. एकीकडे आज दिल्लीमध्ये एनडीएची (NDA) बैठक होत आहे. या बैठकीत देशातील तब्बल ३८ पक्षांचे नेते हजर आहेत.

तर आजच बेंगळूरमध्ये विरोधी पक्षांची दुसरी बैठक पार पडत आहे. ज्यामध्ये २६ पक्षाचे नेते हजर होते. आता या आघाडीचं नाव निश्चित करण्यात आले आहे. या नावाची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Opposition Party Meeting
Opposition Meeting in Bengaluru : सत्ता किंवा पंतप्रधानपदामध्ये काडीमात्र रस नाही; काँग्रेसची स्पष्ट भूमिका

विरोधकांच्या पक्षाचे नाव ठरले...

याबाबत अधिक माहिती अशी की, बिहारच्या (Bihar) पटनामध्ये पहिली बैठक झाल्यानंतर आता आज बंगळुरूमध्ये (Bengluru) विरोधी पक्षांची बैठक पार पडत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहणार आहेत. तर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कालच बंगळुरुत दाखल झाले आहेत. देशातील २६ पक्षांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.

INDIA चा अर्थ काय?

या विरोधकांच्या आघाडीला INDIA असे नाव देण्यात आलं आहे. इंडिया म्हणजेच "इंडियन नेशनल डेमोक्रेटिक इंक्लूसिव एलायंस" (indian National Democratic Inclusive Alliance) असा याचा अर्थ आहे. मराठीमध्ये याचा अर्थ भारतीय राष्ट्रीय लोकशाहीवादी सर्वसमावेशक आघाडी असे आहे.

Opposition Party Meeting
Nagar News : महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ : भाजपच्या माजी मंत्र्यांचा पोलिसांना इशारा

पंतप्रधानपदासाठी इच्छूक नाही... कॉंग्रेसचे स्पष्टिकरण

दरम्यान, या बैठकी दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छूक नसल्याचं म्हटलं आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे. काँग्रेसने पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com