

नीट पेपरफुटी प्रकरणात रोज नव-नवे धक्कादायक खुलासे समोर यतायत. मॉडर्न कॉलेजची बायोलॉजीची प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरेला बेड्या ठोकल्यानंतर तिनं नॅशनल टेस्टिंग एजन्सी च्या विश्वासार्हतेचा कसा लचका तोडला ते पाहून तपास अधिकारीही थक्क झालेत. प्राध्यापिका असलेली मनिषा मांढरेची पेपर फोडण्यात चतुराई इतकी होती की एखाद्या सराईत गुन्हेगारालाही लाजवेल. कारण नीटचा पेपर फोडण्यासाठी मांढरेनं चलाख मेंदूचा वापर केलाय. त्यामुळे सीबीआय पुढे कोर्टात टिकणारे पुरावे गोळा करण्याचं सर्वात मोठं आव्हान आहे. काय केलंय मनिषा मांढरेनं ते पाहूयात...
मांढरेनं कसा फोडला पेपर?
प्रश्न तोंडपाठ करून पेपर फोडला
विद्यार्थ्यांना वहीत लिहून दिले सर्व प्रश्न
पेपरमधील प्रश्नांचं पुस्तकात मार्किंग केलं
विशेष कोचिंग सत्रात पुरवले सर्व प्रश्न
पुरावे सापडू नये म्हणून टाळला डिजिटल साधनांचा वापर
२५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असल्यानं मनीषा मांढरेला अभ्यासक्रमातले प्रश्न लिहून ठेवण्याची गरजच भासली नाही. पुण्यातील आपल्या घरी ब्युटी पार्लर चालक मनिषा वाघमारेच्या मदतीने तिने निवडक विद्यार्थ्यांसाठी छुपे क्लासेस घेतले.
तिथे विद्यार्थ्यांना काही प्रश्न वहीत लिहून घ्यायला लावले, तर काही पुस्तकात टिकमार्क करून दिले. आणि धक्कादायक म्हणजे नेमके तेच प्रश्न नीटच्या मुख्य परीक्षेत आले! त्यामुळे डिजिटल पुराव्यांशिवाय सीबीआय आता मांढरेच्या स्मरणशक्तीच्या बळावर केलेल्या गुन्ह्याचा पर्दाफाश कसा करणार, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.