Neet Paper: मनीषा हवालदारच्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये 'GOD' नाव असलेला नंबर; CBI नं अखेर उलगडला नावाचा सस्पेन्स

NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटीची साखळी चक्रावून टाकणारी आहे. या तपासात समोर आलेलं गॉड नावाचा कोड सीबीआयनं सोडवलं असून नंबर कोणाचा आहे, याचा उलगडा झाला आहे.
NEET Paper Leak Case:
‘GOD’ Number Decoded in NEET Scam Probe, Key Link in Paper Leak Exposedsaam tv
Published On
Summary
  • मनिषा वाघमारे, मनिषा मांढरे आणि मनिषा हवालदार यांच्यात रेस्टॉरंट मध्ये चर्चा?

  • हवालदार यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी

  • हवालदार यांना ५ दिवसांची सी बी आय कोठडी

NEET पेपरफुटी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. अशातच अटक झालेली मुख्याध्यापिका मनिषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये 'गॉड' नावाचा संशयास्पद नंबर आढळला. त्यानंतर गॉड कोण याचा तपास सीबीआयकडून करण्यात आला. आता या नंबरचा कोड नेमचा उलगड झाला आहे. पेपरफुटीचा गॉडफादर आहे का? याचा उलगडा झाला आहे.

NEET Paper Leak Case:
नीट पेपरफुटीचा आणखी एक बळी; पेपर फुटीच्या तणावातून लातूरमधील विद्यार्थिनी संपवलं जीवन

नीट पेपरफुटी प्रकरणात (केंद्रीय अन्वेषण विभाग) सीबीआयच्या तपासातून आता अत्यंत धक्कादायक आणि मोठे खुलासे होत आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या पॅनलवरील फिजिक्स विषयाच्या तज्ज्ञ मनीषा संजय हवालदार हिला पुण्यातून अटक केल्यानंतर सीबीआयने केलेल्या फॉरेन्सिक तपासणीत अनेक गुपिते उघड झालीत. मनीषा हवालदार हिच्या पतीच्या मोबाईलमध्ये 'गॉड' (God) नावाने सेव्ह असलेला संशयास्पद क्रमांक आढळून आल्यानं पेपर फुटीचा गॉडफॉदर कोण अशी चर्चा सुरू झाली होती.

NEET Paper Leak Case:
20 हजार कोटींची ‘ट्युशन फॅक्टरी’; कोचिंगचा गोरखधंदा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

हा नंबर कोणाचा असा प्रश्न तपास यंत्रणेसमोर होता. दरम्यान सीबीआयनं या नंबरचा छडा लावला असून हा नंबर तेजस शहा या विद्यार्थ्याचा असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.

पेपरफुटीत शहाची महत्त्वाची भूमिका

सीबीआयने पुण्यातील सदाशिव पेठेतील हवालदारच्या निवासस्थानी घेतलेल्या झाडाझडतीत मोबाईल, लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि नीट प्रश्नपत्रिकेच्या प्रती जप्त केल्या होत्या. हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये ‘गॉड’ आणि ‘डॉ. उषा’ या नावांनी सेव्ह असलेल्या क्रमांकांसोबत संशयास्पद संवाद आढळून आले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नीट पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवणे आणि पैशांची देवाणघेवाण करणे ही कामे तेजस शहाच्या माध्यमातून होत होत होती.

पुरावे नष्ट करण्यासाठी नोट्स जाळल्या आणि चॅट केले डिलिट

चौकशीची चाहूल लागताच आरोपी मनीषा हवालदार हिने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिने स्वतः तयार केलेल्या फिजिक्स विषयाच्या प्रश्नांच्या हस्तलिखित नोट्स जाळल्या. जेणेकरून तपास यंत्रणांच्या हाती कोणताही लेखी पुरावा लागू नये. मनीषा हवालदार हिने लेखी पुरावेच नव्हे, तर डिजिटल पुरावे नष्ट केली होती. तिने सहआरोपी आणि बायोलॉजी विषयाची प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्यासोबत केलेले सर्व व्हॉट्सॲप चॅट्स आणि मेसेजेस डिलीट केली होती. मनीषा हवालदार हिने स्वतःच्या फोनसोबतच पतीच्या मोबाईलचा वापर करूनही मनीषा मांढरेला प्रश्नमालिका पाठवल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com