बाबा-बुवांची कधीही गरज भासली नाही; अशोक खरात भेटीच्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांचं स्पष्टीकरण, VIDEO

neelam gorhe news : अशोक खरात भेटीच्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला कधीही बाबा-बुवांची गरज भासली नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
neelam gorhe on ashok kharat
neelam gorheSaam tv
Published On
Summary

नाशिक भोंदूबाबा प्रकरणाने राजकारण पेटलं

तृप्ती देसाई यांचे नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप

नीलम गोऱ्हे यांनी तृप्ती देसाईंचे आरोप फेटाळले

नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. लिंगपिसाट भोंदूबाबाच्या संपर्कात शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे देखील होत्या, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला. तृप्ती देसाई यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. देसाईंच्या आरोपावर शिवसेना महिला नेत्या नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बाबा-बुवांची कधीही गरज भासली नाही, असं म्हणत तृप्ती देसाई यांनी तृप्ती देसाई यांचे आरोप फेटाळून लावले.

शिवसेना महिला नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेत तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप धुडकावून लावले. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, 'मी गेल्या चार दशकांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. माझी कारकीर्द स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आणि पारदर्शी राहिलीये. माझ्या कामाची पद्धत आणि माझी तत्वे कधीही कोणापासून लपलेली नाहीत'.

माझे पंढरपूरचे आजोबा दिवंगत अॅड. श्रीपाद देशपांडे आणि माझी आई लतिकाताई गोऱ्हे , शास्रज्ञ वडील डॉ. दिवाकर गोऱ्हे यांनी माझ्यावर जे आधुनिक संस्कार बिंबवले आहेत. त्यांच्या संस्काराचे काटेकोरपणे पालन करत आले आहे. 'कोणत्याही ढोंगी, गुरूचा अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही, मी त्यांचे संस्कार आजही पाळते. माझी अढळ श्रद्धा देवदेवता, अक्कलकोट स्वामी समर्थ, साईबाबा, गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर येथील श्रीदत्त महाराज यांच्यावर आहे, असे गोऱ्हे यांनी सांगितले.

neelam gorhe on ashok kharat
भोंदू खरातचे काळे कारनामे संपेना! राजकीय नेत्यांना लावला लाखोंचा चुना; १ किलो मधाची बाटली ९ लाखांना विकायचा
neelam gorhe on ashok kharat
भोंदू खरातचे काळे कारनामे संपेना! राजकीय नेत्यांना लावला लाखोंचा चुना; १ किलो मधाची बाटली ९ लाखांना विकायचा

'महिलांची प्रगती, सामाजिक न्याय हे काम करत मी राजकारण प्रवेश केला. मी प्रबोधनकारांचं हिंदुत्व मानते. मला राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कोणत्याही तांत्रिक गुरू'ची किंवा बुवाबाजीची गरज भासलेली नाही. नाशिकच्या अशोक खरातला ६-७ वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटल्याचा वृत्ताचा स्पष्ट आणि निःसंदिग्धपणे इन्कार करते. या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com