Pratabrao Jadhav Minister: बाजार समितीमधील अडत व्यापारी ते चारवेळा खासदार; असा आहे प्रतापराव जाधव यांचा राजकीय प्रवास

Modi 3.0 Cabinet Prataprao Jadhav : प्रतापराव जाधव यांनी २००९,२०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवलाय. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे प्रतापराव जाधव यांनी यावेळी २९,३७६ मतांनी विजय मिळवला आहे.
Pratabrao Jadhav Minister: बाजार समितीमधील अडत व्यापारी ते चारवेळा खासदार; असा आहे प्रतापराव जाधव यांचा राजकीय प्रवास
Modi 3.0 Cabinet Prataprao Jadhav Facebook

सलग चौथ्यांदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याचा विक्रम करणारे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली. प्रतापराव जाधव हे शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत असलेल्या प्रतापराव जाधव यांनी आमदारकी आणि खासदारकी दोन्हीची हॅटट्रिक करण्याचा पराक्रम केलाय

प्रतापराव जाधव यांनी २००९,२०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेत. प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र दगडू खेडेकर यांचा पराभव करत चौथ्यांदा संसदेत प्रवेश केला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे प्रतापराव जाधव यांनी २९,३७६ मतांनी विजय मिळवला आहे. मतमोजणी दरम्यान अखेरच्या २५ व्या फेरीमध्ये महायुतीचे प्रतापराव जाधव यांना ३, ४८,२३८ मते मिळाले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना ३,१८, ८६२ मते मिळाली आहेत.

प्रतापराव जाधव यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९६० रोजी बुलढाणा तालुक्यातील मेहकर येथे झाला. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं. प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली होती. जाधव यांनी मेहकर तालुक्यातून त्यांच्या राजकारणाला सुरुवात केली. आता केंद्रीय मंत्रीपदी त्यांची वर्णी लागल्याने बुलढाणा जिल्ह्यात शिंदेसेनेला चांगलीच उभारी मिळेल.

मेहकर बाजार समितीमध्ये ते अडत व्यापारी म्हणून काम करत असायचे. त्यावेळी त्यांनी बाजार समितीमधील पॅनल उभे करून त्या ठिकाणी देखील सत्ता ताब्यात घेतली. प्रतापराव जाधव १९९५ मध्ये ते पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. नंतरच्या काळात त्यांनी मेहकरमध्ये आपला वर्चस्व वाढवलं. त्यामुळे १९९९ आणि २००४ या विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी आपला मतदारसंघ कायम राखला होता.

प्रतापराव जाधव यांनी मेहकरचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. मेहकर तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती झाले. यानंतर ते जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकलेही. मेहकरचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केले. जिल्हा बँकेचे संचालक, उपाध्यक्ष अशी पदे त्यांना मिळाली.

१९९५ साली ते पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. त्यानंतर सलग तीन वेळा ते विधानसभेचे आमदार होते. १९९५ ते २००९ या काळात ते आमदार होते. युती काळात १९९७ ते १९९९ या काळात त्यांनी क्रीडा राज्यमंत्री म्हणूनही काम केले. त्यानंतर प्रतापराव जाधव यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दिल्ली गाठली.

राजकीय प्रवास

१९९५ ते २००९ – आमदार , मेहकर विधानसभा

१९९७ ते १९९९ – क्रीडा राज्य मंत्री . महाराष्ट्र राज्य.

२००९ – बुलढाणा लोकसभा मतदार संघातून शिवसेना कडून खासदार म्हणून निवड.

२००९ ते २०२४ सलग चार वेळा बुलढाणा लोकसभा मतदार संघातून विजय.

२००९ ते २०२४ – अनेक संसदीय समितीत सदस्य म्हणून काम

Pratabrao Jadhav Minister: बाजार समितीमधील अडत व्यापारी ते चारवेळा खासदार; असा आहे प्रतापराव जाधव यांचा राजकीय प्रवास
Modi 3.0 Cabinet: पहिल्याच संधीत मंत्रिपद; नगरसेवक ते खासदार असा आहे मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com