NCP पदाधिकाऱ्याच्या वडिलांची हत्या; महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा थरार

55-Year-Old Ravindra Chavan Man Stabbed to Death Outside: अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील न्यू आर्ट्स कॉलेजच्या गेटसमोर रविंद्र रामभाऊ चव्हाण यांची चाकूने हत्या करण्यात आली. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक पदाधिकारी मंथन चव्हाण यांचे वडील होते.
NCP OFFICE BEARER’S FATHER RAVINDRA CHAVAN KILLED
NCP OFFICE BEARER’S FATHER RAVINDRA CHAVAN KILLEDsaam tv
Published On: 

सुशील थोरात, साम टीव्ही

अहिल्यानगर शहरातील अत्यंत गजबजलेल्या बालिकाश्रम रोडवरील न्यू आर्ट्स कॉलेजच्या गेटसमोर एका ५५ वर्षीय व्यक्तीचा दोघांनी चाकू खुपसून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. रवींद्र रामभाऊ चव्हाण या खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे नगर शहरात खळबळ उडाली आहे. रवींद्र चव्हाण हे आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बालिकाश्रम रोड परिसरात होते.

NCP OFFICE BEARER’S FATHER RAVINDRA CHAVAN KILLED
मोठी बातमी! शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचा उमेदवारी अर्ज रद्द; राजकीय वर्तुळात खळबळ

त्यावेळी दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्या पाठीत अचानक चाकू भोसकला. या प्राणघातक हल्ल्यात चव्हाण हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. बालिकाश्रम रोड ते न्यू आर्ट्स रोड हा परिसर महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विविध अकॅडमी क्लासेसमुळे नेहमीच गजबजलेला असतो. संध्याकाळची वेळ असल्याने परिसरात विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ होती. याच वर्दळीत हा थरार घडल्याने परिसरात बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. हल्ला केल्यानंतर दोन्ही हल्लेखोर तरुणांनी घटनास्थळावरून तत्काळ पळ काढला.

NCP OFFICE BEARER’S FATHER RAVINDRA CHAVAN KILLED
Mumbai News: मोठी बातमी! मुंबईत १५ दिवसांची जमावबंदी लागू, नेमकी कशावर असणार बंदी?

हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिसरातील हॉटेल आणि इतर आस्थापनांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली असून त्याआधारे हल्लेखोरांनी माहिती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचदरम्यान, न्यू आर्ट्स कॉलेजच्या मैदानावर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

NCP OFFICE BEARER’S FATHER RAVINDRA CHAVAN KILLED
Gadchiroli Bus Accident: अचानक नियंत्रण सुटलं अन् ST बस उलटली; शिवणी नदी पुलावर मोठा अपघात

या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी चव्हाण यांना उपचारासाठी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रविंद्र चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवकचे पदाधिकारी मंथन चव्हाण यांचे वडील असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या निकटवर्तीय मानले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com