Beed APMC Election: परळी, अंबाजोगाईत राष्ट्रवादीचीच हवा; "मैं हूँ डॉन..." गाण्यावर थिरकले धनंजय मुंडे, पाहा VIDEO

Dhananjay Munde Dance Video: धनंजय मुंडेंच्या केलेल्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
NCP Mla Dhananjay Munde Dance Video
NCP Mla Dhananjay Munde Dance Video Saam TV

Beed APMC Election Result: राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे प्राथामिक कल निकाल हाती येत असून, काही ठिकाणी निवडणुकांचे अंतिम निकालही समोर आले आहे. सर्वांचच लक्ष लागून असलेल्या बीडमधील परळी बाजार समितीच्या निवडणूकीत अखेर धनंजय मुंडे यांच्या पॅनलने एकहाती विजय मिळवला आहे. मुंडेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पॅनलने १८ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय.  (Latest Marathi News)

NCP Mla Dhananjay Munde Dance Video
Shivrajyabhishek Sohala: शिवराज्याभिषेक सोहळ्याला PM मोदी रायगडावर येणार? शिंदे सरकारचं निमंत्रण, PM पदाचं कनेक्शनही सांगितलं

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बसलेला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या पॅनलने विजय मिळवताच आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा केला असून "मै हू डॉन..." या गाण्यावर भन्नाट डान्सही केलाय. धनंजय मुंडेंच्या केलेल्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Breaking Marathi News)

व्हायरल झालेल्या व्हिडीओत धनंजय मुंडे हे कार्यकर्त्यांसह गुलाल उधळून डीजेच्या तालावर "मै हू डॉन..." या गाण्यावर ठेकाही ठरताना दिसून येत आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजच्या निकालावरून बीडच्या ग्रामीण भागावर धनंजय मुंडे यांचं चांगलंच वर्चस्व असल्याचं दिसून आलं आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल (APMC Election) जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर मुख्यमंत्रीपद असलेल्या शिंदे गटाची मात्र दारुण अवस्था झाली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष बीडमधील परळी आणि अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. (Maharashtra Political News)

या निवडणुकीच्या निमित्ताने मुंडे भाऊ-बहीण पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. पंकजा मुंडे या परळीतच ठाण मांडून होत्या. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आपआपलं पॅनल निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं होतं. मात्र, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पंकजा मुंडे यांना धक्काच बसला आहे. पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे सर्वात कमी उमेदवार निवडून आले आहेत. पंकजा यांचा बाजार समितीतील हा सर्वात मोठा पराभव असल्याचं मानलं जात आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com