Shivrajyabhishek Sohala: शिवराज्याभिषेक सोहळ्याला PM मोदी रायगडावर येणार? शिंदे सरकारचं निमंत्रण, PM पदाचं कनेक्शनही सांगितलं

Shivrajyabhishek Sohala News: यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ताने राज्य सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे.
Shivrajyabhishek Sohala in Marathi
Shivrajyabhishek Sohala in MarathiSaam TV

Shivrajyabhishek Sohala in Marathi: यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ताने राज्य सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा आमंत्रण देण्यात आलं आहे. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने मोदींना आमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या महोत्सवाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Shivrajyabhishek Sohala in Marathi
Barsu Refinery Project: बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलकांना जामीन; कोर्टानं घातली महत्वाची अट

येत्या २ जूनला रायगडावर (Raigad) राज्य सरकार शिवराज्याभिषेक महोत्सव साजरा करणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. या बैठकीत शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येणाऱ्या शिवप्रेमींच्या निवासाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.

याशिवाय सोहळ्याच्या दिवशी २४ तास रुट वे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे तारखेनुसार आणि तिथीनुसार होणारा वाद टाळण्यासाठी राज्य सरकारने दोन्ही मुहुर्तावर हा सोहळा साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

Shivrajyabhishek Sohala in Marathi
Uday Samant On Barsu Refinery Project: 'बारसूमधील लाठीचार्ज प्रकरणी गैरसमज; बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, हा महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यादृष्टीने राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील मान्यवरांकडून कल्पना मागवण्यात आल्या आहेत. राज्याभिषेक सोहळा हा खालील जमिनीवरती तिथे होत नाही हा गडावरती होतोय आणि त्याच्यामुळे उंचावरती होत असताना, कशा प्रकारे होणार काय होणार आणि जे काय लाखो शिवभक्त येणार आहेत त्यांची व्यवस्था काय, महिला असतील, पुरुष असतील या सगळ्यांची व्यवस्था करायची

त्याचीही आढावा बैठक अधिकाऱ्यांच्या समवेत आम्ही आज घेतली असल्याची माहिती शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे. त्याचबरोबर "आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना निमंत्रित करण्याचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पर्यटन मंत्री यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. मोदींना आम्ही आठवण करून दिलीये की तुम्ही पंतप्रधान व्हायच्या अगोदर रायगडावरती आला होता आणि तो कार्यक्रम करून गेल्यानंतरच तुम्ही पंतप्रधान झाले", असंही भरत गोगावले यांनी सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com