Uday Samant News: बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काल बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केल्याचा आंदोलकांनी आरोप केला होता. मात्र, कालच्या आंदोलनावर भाष्य करताना 'लाठीचार्ज हा समूहाने होतो. असा लाठीचार्ज झाला नाही, असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले.
लोकप्रतिनीधी आणि सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले, 'आज बारसू प्रकल्पावर चर्चा झाली. लोकप्रतिनिधीही चर्चेला उपस्थित होते. बारसू प्रकल्पावरून पोलीस बळाचा वापर करून या सर्व गोष्टी करण्यात येत आहे, असा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काल देखील प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. काही महिला ताब्यात घेतल्यानंतर ताबडतोब सोडून देण्यात आलं. केवळ पुरुषांनाच ठेवण्यात आलं'.
' ३५३ सारखे गुन्हे असे लावणार नाही, याची खात्री आजच्या बैठकीतून दिली. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की, बारसू प्रकल्पाच्या आसपास काही शासकीय अधिकाऱ्यांनी जमिनी घेतल्याचं खासदाराने सांगितलं. तसेच काही आंदोलकांनी देखील सांगितलं. त्याच्यावर एकसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. याची दोन दिवसांत चौकशीत होईल. कुणी दोषी आढळलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
'बारसू प्रकरणी शासनाने पाऊल पुढे टाकलं आहे. या प्रकरणी स्थानिकांशी संवाद साधला आहे. जिल्हाधिकारी, आयुक्त देखील उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी देखील संवाद साधतील. सर्वेक्षण करण्यात येत आहे, हा एक गैरसमज पसरवला जात आहे, असेही उदय सामंत म्हणाले.
'मातीचं परिक्षण करत आहोत. माझी सत्यजित चव्हाण यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. हा प्रकल्प आम्हाला कुठेही रेटून पुढे न्यायचा नाही. सर्वांचं समाधान, शंका दूर करून प्रकल्प पुढे न्यायचा आहे, असे सामंत यांनी सांगितले.
बेरोजगारी दूर करणारा प्रकल्प आहे. आंदोलक आक्रमक झालेले होते. त्यावेळी पोलिसांसोबत झटापट होते. लाठीचार्ज हा समूहाने होते. असा लाठीचार्ज झाला नाही. काही अतिरेक झाला तर चौकशी करू, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.