दोन्ही राष्ट्रवादीत विलिनीकरणावर खलबतं? सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून आमदारांना फोनाफोनी?

Ncp Merger Talks Sunetra Pawar Office Calls Mlas: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा काही थांबत नाहीये. दोन्ही राष्ट्रवादींकडून विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी पडद्यामागे काहीतरी घडत असल्याचं दिसंतय. त्यात खासदार राऊतांनी केलेल्या दाव्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीत घडामोडी वाढल्यात... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
NCP MERGER UPDATE
NCP MERGER UPDATEsaam tv
Published On: 

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा काही केल्या थांबायला तयार नाही. दोन्ही बाजूनं विलिनीकरणाला पूर्ण विराम दिल्याचं सांगितलं जात असलं तरी पडद्यामागे वेगानं हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याला कारणही तसंच आहे. जशी वेळ येईल तसं तुम्हाला कळेल असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून आमदारांना धडाधड फोन गेल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे खासदार पार्थ पवारांनीच या आमदारांची पुण्यात बैठक घेतली. त्यामुळे ही बैठक विलिनीकरणाबाबत आमदारांची भावना जाणून घेण्यासाठी होती की राऊतांनी राष्ट्रवादीचे २०-२२ आमदार फुटणार असल्याचा दावा केल्यामुळे कानोसा घेण्यासाठी होती यावरून वेगवेगळे कयास बांधले जातायत. मात्र या बैठकीला असलेल्या मंत्री आणि आमदारांनी नेमकं काय सांगितलं ते पाहूयात...

तर दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार फुटणार असल्याचा दावा करणाऱ्या संजय राऊतांनी मात्र सुनेत्रा पवारांच्या पक्षाकडून विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सूचक विधान केलंय.

पडदा एका बाजूनंच उचकवला जात असल्याचं राऊत म्हणत असले तरी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत आहेत. आता दोन्ही पक्षाचे हे तिघं नेतेमंडळी दिल्लीत असणं केवळ योगायोग आहे की पडद्यामागे काहीतरी घडामोडी सुरू आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पडदा एका बाजूनं उघडला जातोय की दोन्ही बाजून याबाबत कमालीची उत्सुकता ताणली गेलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.