रोहित पवारांकडे अजित पवारांनी विलिनीकरणा सदर्भात अनेक पुरावे असल्याचा दावा केला असला तरी आता विलिनीकरणाला ब्रेक लागल्याचं स्पष्ट झालंय. कारण सुप्रिया सुळेंनी अजितदादांची स्वप्न आणि त्यांनी केलेल्या चर्चा त्यांच्यासोबतच गेल्याचं सूचक विधान केलंय. तर दुसरीकडे रोहित पवारांनीही अजितदादा गेल्यानंतरच विलिनीकरणाला पूर्णविराम दिल्याचं विधान केलंय.
खरंतर अजित पवारांच्या मृत्यूनंतर खुद्द शरद पवारांनी विलिनीकरणावर भाष्य केलं... दादांसोबतच्या चर्चेत विलिनीकरणासाठी 12 फेब्रुवारी तारीख ठरली होती, असंही पवारांनी म्हटलं.. त्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चेनं उचल खाल्ली... मात्र आता साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अधिकृत प्रस्ताव आल्यास विलिनीकरणावर चर्चा करू असं स्पष्ट केलंय. मात्र दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण थांबल्यास त्याचे कोणते राजकीय परिणाम होऊ शकतात...
विलिनीकरण झालं नाही तर मत विभाजनाचा फटका दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता आहे... नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीतील घसरणीमुळे आगामी काळात पक्ष अस्तित्वाचंही संकट उभं राहू शकतं.. एवढंच नाही तर कार्यकर्त्यांच्या मनोबलावरही परिणाम होऊ शकतो... याबरोबरच सुप्रीम कोर्टातील पक्ष आणि चिन्हाची लढाईही आणखी तीव्र होऊ शकते...
आता उपमुख्यमंत्रिपदाची आणि पक्षाची सुत्रं हाती घेत असलेल्या सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा विलिनीकरणाच्या चर्चेचं दार उघडणार की विलिनीकरण कायमचं थंड बस्त्यात जाणार? याबाबत उत्सुकता लागलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.