NCP Merger: बारामतीत राजकीय घडामोडींना वेग! सुनील तटकरेंनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये ४५ मिनिटं चर्चा

Sunil Tatkare Meet Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहे. आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.
NCP Merger: बारामतीत राजकीय घडामोडींना वेग! सुनील तटकरेंनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये ४५ मिनिटं चर्चा
Sunil TatkareSaam tv
Published On: 

राज्याच्या राजकारणात येत्या काही दिवसांत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला वेग आला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठका वाढल्या आहेत. अशातच आज बारामतीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची भेट घेतली. बारामतीच्या काटेवाडीतील निवासस्थानी या तिन्ही नेत्यांची भेट झाली. जवळपास ४५ मिनिटं या नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात विलिनीकरणाबाबतच्या चर्चांनी जोर धरला आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजितदादांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी जाऊन पवार कुटुंबांची भेट घेतली. जवळपास ४० ते ४५ मिनिटे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, जय पवार, पवार कुटुंब आणि सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाली. पवार कुटुंबीयांच्या भेटीनंतर सुनील तटकरे आपल्या पुढील दौऱ्यासाठी मार्गस्थ झाले.

NCP Merger: बारामतीत राजकीय घडामोडींना वेग! सुनील तटकरेंनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये ४५ मिनिटं चर्चा
NCP Merger:राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार? दोन्ही गटांकडून आमदारांसोबत चर्चा सुरु

दरम्यान या भेटीमध्ये काय चर्चा झाल्या यावर प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता सुनील तटकरे यांनी बोलण्यास नकार दिला.'मी आई ला भेटायला आलेलो', असे सुनील तटकरे यांनी सांगितले. पण बारामतीमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीची आणि बैठकीची आता चर्चा होत आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समोर आली नाही. तसंच, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल हे आज पुन्हा शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

NCP Merger: बारामतीत राजकीय घडामोडींना वेग! सुनील तटकरेंनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये ४५ मिनिटं चर्चा
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्र्यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले शरद पवार...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.