

NCP merger, Chhagan Bhujbal statement : गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला जोर आला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलीनीकरणावर जोर दिला जातोय. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावध भूमिका घेतली जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर महत्त्वाचं विधान करत सवाल उपस्थित केला आहे. विलीनीकरणाबाबत घाई करण्याची गरज काय ? असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. नाशिकमध्ये ते बोलत होते. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही आम्ही सुनेत्रा पवार यांची नेमणूक करणार आहेत, तसा निर्णय झाला आहे, असे वक्तव्यही यावेळी त्यांनी केले.
विलीनीकरणाची चर्चा का केली जातेय? विलीनीकरणाची इतकी घाई का केली जाते? हे मला कळत नाही. विलीनीकरणाची चर्चा एका महिन्यानेही करता येईल. सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्या राष्ट्रीय अध्यक्षही होतील, असे भुजबळ म्हणाले. विलीनीकरणावर दोन्ही बाजूने चर्चा होईल, पण सध्या घाई का करत आहेत? ठरलं होतं हे म्हणण्यात अर्थ नाही. नवीन कॅप्टन आले आहेत, त्यांना ठरवू द्या, असा सल्ला त्यांनी दिला. सध्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांना बसवणं, हा माझा प्रमुख अजेंडा आहे अन् हे १०० टक्के ठरलेय, असेही भुजबळ म्हणाले.
दोषी आढळले तर राजीनामा देईल असे झिरवाळ म्हणाले आहेत. बरोबरच आहे. पोलीस चौकशी करतील. काय खरं? काय खोटं? सर्व समोर येईल. आलेल्या तक्रारीवर कोणी बोलत नाही.. मंत्रालयात अनेक लोक काम करत असतात, असे भुजबळ म्हणाले. दरम्यान, एसीबीच्या धाडीनंतर मंत्री झिरवाळ नॉट रिचेबल आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.