सुनेत्रा पवारांना वगळून NCP नेते शाहांच्या भेटीला; वळसे पाटील, मुंडेंचं मंत्रिमंडळात 'कमबॅक' होणार?

दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवारांना वगळून थेट गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतलीय... आधीच पक्षनेतृत्व आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये NCPमधील अंतर्गत वाद उघडकीस आलाय.. अशातच शाहांच्या भेटीमागे नेमकं कारण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
NCP LEADERS MEET AMIT SHAH WITHOUT SUNETRA PAWAR
NCP LEADERS MEET AMIT SHAH WITHOUT SUNETRA PAWARsaam tv
Published On: 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना वगळून दादांच्या राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांनी 1 नोव्हेंबरच्या रात्री दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली.या बैठकीचा फोटो समोर आला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या कारण या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हजर नव्हते. साहजिकच अध्यक्षांना वगळून पक्षीय नेते शाहांना का भेटले असा प्रश्न उपस्थित झाला आणि राष्ट्रवादीतल्या अंतर्गत वादाची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली

शाहांच्या भेटीस राष्ट्रवादीचे कोण?

खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ शाहांसोबतच्या भेटीस उपस्थित होते...

दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीमागची इनसाईड स्टोरीही समोर आलीय...

बैठकीतली इनसाईड स्टोरी

- अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थखातं परत हवं

- दादांच्या राष्ट्रवादीला दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण नको

- दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यास दादांच्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार नाही

- माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडेंच्या कॅबिनेटमधील कमबॅकसाठी चर्चा

बैठकीतले हे इनसाईड बाहेर आल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कुरघोडीं राजकारण सुरू झालं. अर्थखातं कुणाला द्यायचं हे ठरवण्यास फडणवीस सक्षम असल्याचं सांगत भाजपनं महायुतीत फडणवीसचं बॉस असल्याचा इशारा दिलाय तर हक्काचं अर्थखातं वारंवार मागूनही मिळत नसेल तर केंद्रातील नेत्यांना भेटावंच लागेल, असं म्हणत राष्ट्रवादीनेही राज्यातील भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिलयं...

दुसरीकडे अर्थखात्यासाठी दादांची राष्ट्रवादी लाचार झालीय, अशी टीका काँग्रेसनं केलीय... दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांच्या सांगण्यावरूनच ही भेट घेतल्याचं स्पष्टीकरण दादांच्या राष्ट्रवादीनं दिलयं....मात्र तरीही पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आणि पक्षनेतृत्वाचे वाद काही लपून राहिलेले नाहीत...सुनेत्रा पवारांनीही अर्थखात्यासाठी उघडपणे ठोस भूमिका न घेतल्यानं पक्षातील वरिष्ठ नेते थेट शाहांच्या भेटीला गेले का? नेतृत्वावरील नाराजीनंतर शाहांच्या भेटीतून पक्षातील वरिष्ठ नेते वेगळीच भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत का? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.