Sharad Pawar News: '११ महिन्यांनंतर या मुलांनी काय करायचं? कंत्राटी भरतीवरुन शरद पवारांची टीका, सरकारकडे केली मोठी मागणी

Maharashtra Politics: राज्यामध्ये महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून कायदा व सुव्यवस्थेबाबत राज्य सरकार गंभीर नाही.. असे शरद पवार यावेळी म्हणाले.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSaam TV
Published On: 

सुरज मासुरकर, प्रतिनिधी

Sharad Pawar News:

राज्यामध्ये महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून कायदा व सुव्यवस्थेबाबत राज्य सरकार गंभीर नाही, अशी चिंता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरुनही त्यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले. वायबी- चव्हाण सेंटवरवरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले शरद पवार?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील कायदा- सुव्यवस्थेवरुन राज्यसरकार निशाणा साधला. "राज्यात पाच महिन्यात 19,553 महिला बेपत्ता असल्याची आकडेवारी बाहेर आली असून ती धक्कादायक आहे. या प्रकरणी गृहमंत्रालयाने योग्य तपास करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

कंत्राटी भरतीवरुन सरकारवर नाराजी..

पोलीस भरतीत ११ महिने कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या नंतर ह्या मुलांनी काय करायचं असा प्रश्न आहे, असे म्हणत कायमस्वरुपी भरती घ्या.. अशी मोठी मागणी शरद पवार यांनी केली. तसेच दत्तक घेतलेल्या शाळेत गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला आहे. सरकारने शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेतला आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या जात आहेत, असे पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar News
Shocking Video: रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला भरधाव कारने उडवलं; भयानक अपघाताचा थरार CCTVत कैद

अजित पवारांवर निशाणा..

मुख्यमंत्रीपदावरुन शरद पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. माझे एक सहकारी होते ते म्हणायचे की शरद पवार हे पंतप्रधान व्हायला हवे, मी म्हणायचो माझ्याकडे १० खासदार आहेत. मी कसा पंतप्रधान होणार. आपल्याकडे किती लोक आहेत यावर ठरते. असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला. (Latest Marathi News)

Sharad Pawar News
MLA Disqualification Case: सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलं; सुनावणीत आज काय झालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com