Shocking Video: रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला भरधाव कारने उडवलं; भयानक अपघाताचा थरार CCTVत कैद

Accident Viral Video: रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्ध महिलेला भरधाव कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला.
woman walking on road Crushed by a car  Shocking accident caught on CCTV
woman walking on road Crushed by a car Shocking accident caught on CCTVSaam TV
Published On: 

Accident Viral Video

रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्ध महिलेला भरधाव कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. थरकाप उडवणारी ही घटना नोएडा सेक्टर 78 मधील महागण मॉडर्न सोसायटी परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

woman walking on road Crushed by a car  Shocking accident caught on CCTV
Snake In Auto: बदलापूर फिरण्यासाठी साप रिक्षावर फना काढून बसला; रेल्वे स्थानकातील थरारक VIDEO व्हायरल

याप्रकरणी पोलिसांनी (Police) कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कृष्णा नारंग (वय 75 वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारंग ह्या मॉडर्न सोसायटी परिसरात राहत होत्या.

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्या फिरण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्यावेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगात कार आली. काही कळण्याच्या आतच या कारने नारंग यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण (Accident) होता, की कारचे समोरील चाक नारंग यांच्या छातीवरुन गेले.

या घटनेत नारंग यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर नारंग यांच्या कुटुंबीयांकडून पोलिसांत तक्रा दाखल करण्यात आली. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी कार चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com