Rupali Chakankar: भोंदूबाबा खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ, SIT ने चौकशीसाठी समन्स बजावला

Nashik Ashok Kharat Case Rupali Chakankar: अशोक खरात प्रकरणात आता रुपाली चाकणकरांविरोधात कारवाई केली जाणार आहे. रुपाली चाकणकरांना एसआयटीने समन्स पाठवला असून चौकशीसाठी बोलावले आहे.
Rupali Chakankar: भोंदूबाबा खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ, SIT ने चौकशीसाठी समन्स बजावला
Nashik Ashok Kharat Case Rupali ChakankarSaam Tv
Published On

Summary -

  • भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड

  • रुपाली चाकणकरांना एसआयटीकडून समन्स

  • शिवनिका ट्रस्टच्या व्यवहारांची चौकशी सुरू

  • सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार

अभिजित सोनवणे, नाशिक

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रुपाली चाकणकरांना एसआयटीने समन्स बजावला आहे. या प्रकरणी त्यांची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार आहे. रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका संस्थान या ट्रस्टच्या विश्वस्त होत्या. त्यामुळे आता या प्रकरणात त्याच्यावर अनेक आरोप केले जात आहे. या प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली चाकणकर यांना एसआयटीकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवनिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार आहे. एसआयटी सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यांची देखील एसआयटीकडून आता चौकशी होणार आहे. शिवानिका संस्थांचे सर्व व्यवहार आता SIT च्या रडारवर आहेत.

भोंदूबाबा खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना एसआयटीकडून समन्स बजावण्यात आले आहे. नाशिक महिला पोलिसांचे पथक रुपाली चाकणकरांना समन्स देण्यासाठी पुण्याला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. एसआयटीकडून शिवनिका संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्याचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत. या सर्वांच्या चौकशीतून नेमकी काय धक्कादायक माहिती समोर येतेय ते पाहणे महत्वाचे राहिल. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, 'समन्स पाठवणे मोठी गोष्ट नाही. समन्स सर्वांना पाठवला जातो. पण चौकशी केल्यानंतर काय कारवाई होते ते महत्वाचे राहिल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com