

भूषण शिंदे
Mumbai News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी 2 जुलै रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा दावा राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अजित पवार लवकरच म्हणजे याच वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा याला पाठिंबा असेल की नाही माहित नाही. पण अजित पवार याच वर्षी मुख्यमंत्री होतील, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)
अजित पवारांबाबतच्या बऱ्याच चर्चा खऱ्या होतात. अजित पवार राज्याचं नेतृत्व करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यांनी ते करावं. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रेबद्दलचा निकाल प्रलंबित आहे, तो लागला की ठरवू. सध्या एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अजितदादाही मुख्यमंत्री व्हावे यासाठी मी पांडुरंगाला साकडं घातलं आहे, असंही अमोल मिटकरी म्हणाले.
कायदेशीर बाबींबद्दल मी बोलणार नाही, तो अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. जर राज्याचं सत्तासमीकरण बदललं तर आगे आगे देखो होता क्या है, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. (Breaking News)
अजितदादांनी जो निर्णय घेतला, तो सर्वांशी चर्चा करुनच घेतला. सर्व आमदारांशी दादांनी चर्चा केली. अजित पवार राज्याचे याचे वर्षी मुख्यमंत्री होतील असा ठाम विश्वास आहे, ठासून विश्वास आहे, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.