चेतन इंगळे
वसई : वाढती महागाई, खाद्य तेलाच्या वाढलेल्या किंमती, पेट्रोल डिझेलचे सतत वाढत असणारे भाव आणि घरगुती गॅस च्या किंमतीत झालेली भाव वाढ आदी विषयांना घेऊन वसई-विरार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज वसईमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. NCP agitation against rising inflation in Vasai
हे देखील पहा -
आंदोलना दरम्यान मोदी सरकारच्या शोषक धोरणांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकार हाय हाय च्या घोषणा देत, केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. वसई पश्चिमच्या नवघर बस स्थानक परिसरात वसई-विरार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.
गॅस सिलिंडरमागे 25 रुपयांची वाढ, पेट्रोल 100 पार, यामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. तरीही निष्ठुर मोदी सरकार दर वाढ कमी करत नाही. कोरोनावर औषध आहे पण मोदी वर औषध नाही. असा घणाघात यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
Edited by : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.