Beed Appointment of Superintendent of Police : खंडणी आणि माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले होत. आता बीड जिल्ह्यत नवे पोलीस अधिक्षक म्हणून नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेतच बीड प्रकरणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.
बीडचे पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करत कारवाईला सुरूवात केली होती. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला दहा लाख रूपयांच्या मदतीची घोषणाही केली. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिल्यानंतर २४ तासांच्या आत बीड जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक दिले आहेत.
बीडचे पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करण्यात आली. मस्साजोग प्रकरणामुळे बीडचे नाव राज्यात चर्चेत होते. कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात होता. विरोधकांनी याप्रकरणामुळे सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उडवून दिली होती. देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ अॅक्शन घेत अविनाश बारगळ यांची उचलबांगडी केली. बीडच्या नवे पोलीस अधिक्षक म्हणून नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आळी आहे. कॉवत सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहत आहेत. त्यांची बीड जिल्हा अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आळी आहे.
खंडणी आणि सरपंचाच्या निर्घृण हत्येनंतर बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर विधिमंडळात चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानुसार अविनाश बारगळ यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांची उचलबांगडी करण्यात आली. आता नवनीत कॉवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहतील.
बीडचे नवे SP नवनीत कॉवत कोण आहेत ?
नवनीत कॉवत हे 2017 बॅचचे IPS अधिकारी आहेत. ते मूळचे राजस्थानचे आहेत. नवनीत कॉवत यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत. कॉवत यांनी आयआयटीमधून बीटेकची पदवी घेतली. घरातून सरकारी नोकरीसाठी वारंवार सांगितलं जायचे, पण बीटेक पूर्ण केल्यानंतर कॉवत यांनी खासही कंपनीमध्ये डिजाईन इंजिनिअर म्हणून नोकरी केली. जॉब करता करता त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी केली. ते २०१७ मध्ये UPSC क्रॅक केली अन् आयपीएस झाले. आता त्यांची नियुक्ती बीडमध्ये झाली आहे. सिंघ अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.