
नाशिक : नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलाजवळ ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकमधील तरुणांना पिकअपमधून दंगा मस्ती आणि रिल्स करणे महागात पडले. लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला पिकअपने धडक दिल्याने ६ तरुणांनी प्राण गमावले. या अपघाताच्या १० मिनिटाआधीच एक तरुण गाडीतून उतरला. त्यामुळे या तरुणाचा जीव वाचला. अपघातातून बचावलेल्या तरुणाने संपूर्ण थरारक प्रसंग सांगितला.
नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलाजवळ रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. तर १० ते १२ जण गंभीर जखमी झाले. लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला पिकअपने मागून धडक दिली. त्यानंतर झालेल्या अपघातात ६ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तरुणांनी अपघातापूर्वी एक व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर केला होता. या तरुणांचा अपघात होण्यापूर्वी एक जण पिकअपमधून उतरला होता. यामुळे या तरुणाचा जीव वाचला. या तरुणाने साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली.
नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात ६ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली, तर अनेक तरुण गंभीर जखमी आहे. मात्र अपघाताच्या 10 मिनिटाआधी विक्रांत ठाकूर नामक तरुण का उतरला, याविषयी विक्रांतने साम टीव्हीला दिली धक्कादायक माहिती दिली. पिकअप गाडी चालक दारूच्या नशेत होता. तो नशेमध्ये गाडी सुरक्षित चालवत नसल्याने विक्रांत ठाकूर या तरुणांनी त्याला सांगितले की, गाडी मी चालवतो, मात्र चालकाने गाडी चालवायला नकार दिला.
विक्रांत अपघात होण्याच्या दहा मिनिट आधीच त्या गाडीतून उतरून दुसऱ्या गाडीमध्ये बसला. त्यानंतर दहाव्या मिनिटांनी विक्रांतला अपघाताची माहिती मिळाली. काही वेळापूर्वी सोबत असलेले मित्र आयुष्यभरासाठी निघून गेले. या अपघातात एकाच कुटुंबातील बाप लेकराचा मृत्यू झाला तर दोन भावांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.