नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर रविवारी रात्री अतिशय भीषण अपघात झाला. सळयाच्या ट्रकला पिकअपने धडक दिली. यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झालाय. मित्रांसोबत पिकअपमध्ये एन्जॉय करणाऱ्यांना क्षणात सगळेच नाहीसे झालेय. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झालाय, तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. भीषण अपघाताआधीचा व्हिडीओ समोर आला आहे.
नाशिकमध्ये अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचा स्टेटसचा शेवटचा व्हिडिओ समोर आलाय. नाशिकच्या निफाड तालुक्यात असलेल्या धारणगाव येथील देवाच्या कार्यक्रमावरून परत येत असताना घटना घडली. व्हिडिओ दिसणाऱ्या ८ तरुणांचा मृत्यू तर काहींची प्रकृती चिंताजनक काही गंभीर जखमी आहेत. सर्व एकाच ठिकाणावरील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला पाठीमागून एक मालवाहू टेम्पोनं धडक दिली. तरुण टेम्पोतून प्रवास करताना नाचताना आणि मजा करताना दिसत आहेत. पण त्यांचा हा आनंद क्षणात मावळला. सहा जणांचा मृत्यू झालाय.
- नाशिकच्या उड्डाणपुलावरील अपघात स्थळी मंत्री गिरीश महाजन पोहचत आहेत
- टेम्पो आणि आयशर ट्रकच्या या भीषण अपघातात ८ जणांचा झालाय मृत्यू
- एकाच कुटुंबातील वडील आणि मुलगा देखील मृत्युमुखी
- अपघात स्थळी पाहणी करून मंत्री गिरीश महाजन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमींची विचारपूस करण्यासाठी जाणार आहेत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.