नाशिकमध्ये वाहतूक पोलिसांकडून रिक्षावाल्यामार्फत वसुलीचा प्रकार समोर.
सीटबेल्ट न लावलेल्या चालकाकडून शंभरच्या पाच नोटा घेण्यात आल्या.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा अडचणीत.
त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर मुद्दा बनला आहे.
ओमकार सोनवणे, साम टीव्ही
नाशिक: येथील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. शहरातील वाहतूक पोलिसांकडून चक्क रिक्षा चालकामार्फत सामान्य माणसांकडून वसूली केली जात आहे, सध्या श्रावण महिना सुरू असल्याने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी राज्यासह देशातून भाविक आणि पर्यटक येतात. धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकची सर्वदूर ओळख आहे.
खांदेश,छत्रपती संभाजीनगर, पुणे आदी जिल्हयांसह परराज्यांमधूनही भाविक हे मोठ्या श्रद्धेने नाशिकमध्ये दाखल होत आहे. नाशिक - पुणे महामार्गावर धुळे जिल्हयातील वाहनचालकाकडून सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे थेट एक रिक्षावाला तोडपाणी करत शंभरच्या पाच नोटा त्या वाहनचालकाकडून घेतांना दिसतोय. या व्हायरल व्हिडिओमुळे नाशिक पोलिसांवर प्रश्न चिन्ह उपस्थित असून शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील एका चारचाकी वाहनाच्या (MH18) चालकाने सीटबेल्ट लावलेले नव्हते. त्यामुळे आंबेडकरनगर जवळ त्यास वाहतूक पोलिसांनी थांबवून त्याला दंडात्मक कारवाईची भीती दाखवली.
यावेळी चक्क एका रिक्षा चालवणाऱ्या महाशयाने मध्यस्थी केली आणि पोलीसदादा हळुवारपणे तेथून निघून गेले. मग संपूर्ण तोडपाणी रिक्षावाल्या पठ्ठ्याने हाताळून शंभर दोनशे रुपयांत काय येत...? दारूचे भाव किती वाढले... वगैरे प्रकारचा संवाद साधून पाचशे रुपये द्यावे लागतील असे सांगून मनधरणी केली. मग त्या चालकाने शंभरच्या पाच नोटा त्या रिक्षाचलकाच्या हातात दिल्या आणि त्याने नंतर त्याने पोलिसाला तेथे बोलावून घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.