
महिलांसाठी राबवण्यात आलेली पिंक ई रिक्षा योजना
आता एकह रुपया न भरता मिळणार रिक्षा
१० टक्के रक्कम केली माफ
महिलांना स्वतः च्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे पिंक ई रिक्षा योजना (Pink E Rikshaw Scheme). महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी ही योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना ई रिक्षा दिली जाते.
यासाठी २० टक्के अनुदान राज्य सरकारकडून दिले जाते. तर १० टक्के रक्कम महिलांना भरावी लागते. आणि ७० टक्के हे बँकेकडून कर्ज दिले जाते. परंतु आता महिलांना जी १० टक्के रक्कम भरावी लागत होती. तीदेखील भरावी लागणार नाहीये. महिलांना आता एकही रुपया न भरता पिंक रिक्षा मिळणार आहे.
किती रुपयांना मिळणार पिंक ई रिक्षा? (Pink E Rikshaw Price)
महिला व बालविकास विभागाने ही योजना राबवली आहे. या पिंक रिक्षाची किंमत ३ लाख ७३ हजार रुपये आहे. त्यातील ३० टक्के रक्कम सरकारकडून दिली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त २ लाख ६२ हजारात ही रिक्षा मिळणार आहे. यासाठी त्यांना बँकेकडून कर्ज मिळणार आहे.
सोलापूरमधील काही महिलांचा सिबिल स्कोअर चांगला नसल्याने त्यांना बँकांकडून कर्ज मिळत नाहीये. ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत. त्या महिला रिक्षा चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी तयार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अर्ज करुनदेखील महिला पुढे येत नसल्याने १० टक्के रक्कम माफ केली आहे.
अर्ज कधीपर्यंत करावा? (Pink E Rikshaw Scheme Application Last Date)
ई पिंक रिक्षासाठी पात्र ठरलेल्या महिलांना आरटीओकडून परवाना घेऊन मोफत प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे. यानंतरच महिलांचे सिबिल स्कोअर बँकांकडे पाठवले जाणार आहे. आता महिला लाभार्थ्यांना द्यायची असलेली १० टक्के रक्कम माफ केली आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त महिलांनी अर्ज करावेत, असं रमेश काटकर (महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर) यांनी सांगितलं आहे.
पिंक ई रिक्षा योजना नक्की काय आहे?
पिंक ई रिक्षा ही महिलांसाठी राबवण्यात आली आहे. या योजनेत सरकारकडून स्वस्त दरात महिलांना रिक्षा दिली जाते.
पिंक ई रिक्षासाठी महिलांना किती पैसे भरावे लागतात?
पिंक ई रिक्षा घेण्यासाठी एकूण २० टक्के रक्कम सरकार देते. १० टक्के रक्कम महिलांना भरायची असते आणि ७० टक्के बँक लोन करावे लागते.
आता महिलांना मोफत पिंक रिक्षा मिळणार का?
सोलापूरमधील अनेक महिला पात्र असतानाही योजनेचा लाभ घेत नाहीये. त्यामुळे आता महिलांना भरायचा असलेला १० टक्के हिस्सादेखील माफ करण्यात आला आहे.
योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?
सोलापूरमधील महिलांना १५ ऑगस्टपर्यंत पिंक ई रिक्षासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.