Mahadevi Elephant: अखेर ठरलं! महादेवी हत्तीणी कोल्हापुरात येणार

Mahadevi Elephant: नांदणी मठाच्या स्वामींसोबत वनताराच्या सीईओची बैठक झाली. जैन बोर्डिंगमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत वनताराच्या सीईओने महादेवी हत्तीणी परत येणार असल्याचं ग्वाही दिली.
Mahadevi Elephant
Mahadevi Elephant In Kolhapurx
Published On
Summary
  • वनताराचे सीईओ विहान करनी यांनी नांदणी मठाच्या स्वामींशी कोल्हापुरात बैठक घेतली.

  • या बैठकीत कोल्हापूरकरांना दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला.

  • कोल्हापुरात वनतारासारख्या सुविधा निर्माण झाल्यानंतर माधुरी हत्तीण परत आणली जाईल.

  • वनताराच्या टीमने याआधी कोल्हापूरकर आणि मठाची अधिकृत माफी मागितली होती.

कोल्हापुरात महादेवी हत्तीणीबाबत राजकारण तापलंय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नंदिणी मठातील हत्तीणीला वनतारा येथे पाठवण्यात आलं. परंतु लोकांनी त्या निर्णयावरून नाराजी व्यक्त करत माधुरीला परत आणण्याची मागणी करू लागले. आज कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाच्या स्वामींसोबत वनताराच्या सीईओंची बैठक सुरू झाली. या बैठकीनंतर वनताराचे सीईओ यांनी माधुरी परत कोल्हापुरात येणार की नाही याचं उत्तर दिलंय.

आज नांदणी मठाच्या स्वामींसोबत वनताराच्या सीईओंची बैठक झाली. जैन बोर्डिंगमध्ये ही बैठक झाली. काही मिनिटे आधीच वनताराने आपलं अधिकृत म्हणणं जाहीर केलं होतं. यामध्ये वनताराच्या टीमने कोल्हापूरकर आणि नांदणी मठाची दिलगिरी व्यक्त केली होती. दरम्यान आज झालेल्या बैठकीनंतर वनताराचे सीईओ विहान करनी यांनी कोल्हापूरकरांना खूशखबर दिली.

Mahadevi Elephant
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांच्यानंतर उद्धव ठाकरे दिल्लीत; पडद्यामागे काय राजकारण घडतंय?

वनतारामध्ये जशा सोयी सुविधा आहेत, तशा सुविधा कोल्हापुरात उपलब्ध करून दिल्या जातील त्यानंतर माधुरीला परत आणलं जाईल. वनताराच्यावतीने नांदणी इथल्या मठाच्या जागेमध्ये महादेवी हत्तीणीसाठी एक चांगलं सेंटर उभं करणार. महादेवीची मालकी ही मठाची असणार मात्र देखभाल वनताराच्या वतीने करण्यात येणार आहे, असं सीईओ विहान करनी यांनी माध्यम प्रतिनिधींसमोर सांगितलं.

Mahadevi Elephant
Mahadevi Elephant: महादेवी अडवणार महायुतीचा BMC कडे जाणारा रस्ता? नंदिनी हत्तीणीवरून राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

हा विजय महादेवीचा आहे. कारण अंबानी यांची इच्छा होती कोल्हापूरच्या महादेवीला वनताराममध्ये चांगलं घर मिळालं पाहिजे. मठातही महादेवीला चांगलं घर मिळालं होतं. आम्ही कोल्हापूरकरांना आश्वस्त करतो की, महादेवी हत्तीणी लवकरात लवकर परत येईल.

सर्व कोल्हापूरकरांचे अभिनंदन! माधुरी हत्तीणीच्या न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून परत येण्याचा निर्णय हा कोल्हापूरातील लोकांच्या एकजूटीचा आणि लोकभावनेचा आहे. या सामुहीक लढ्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. माधुरीला कोल्हापुरात पुनर्वसन करण्याचा वनतारा व्यवस्थापनेच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो.
आमदार सतेज पाटील

माधुरी हत्तीणीसाठी सुप्रीम कोर्टात वनतारा, नांदणी मठ आणि राज्य सरकार पीटीशन दाखल करणार आहे. वनतारामध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा महादेवीला कोल्हापुराजवळ देण्यातील येतील, हे पेटा ला पुन्हा पटवून देऊ असं वनताराचे सीईओ विहान करनी यांनी सांगितलं. दरम्यान आजच्या बैठकीलानांदणी मठाचे स्वामी, वनताराचे सीईओ विहान करनी, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राहुल आवाडे हे या बैठकीला उपस्थित आहेत. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला.

कोल्हापूरतील नांदणी गावातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला वनतारा येथे नेण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही हत्तीण नांदणी येथे होती. या हत्तीणीला नेल्यामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. माधुरीला वनताराला नेण्यात आल्यानं कोल्हापुरातील अनेक गावांमधील जिओ ग्राहकांनी आपलं जिओ सिम पोर्ट करत न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला.

इतकेच नाही तर कोल्हापूरकरांनी महादेवी हत्तीणी परत आणावी यासाठी पदयात्रा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. यावेळी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महायुती सरकारला इशारा दिला. कोल्हापूरकरांच्या भावना पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेत. सरकार देखील कोल्हापूरकरांच्या सोबत आहे. हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार मध्यस्थी करणार आहे. सरकारदेखील माधुरीला परत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com