Uddhav Thackeray Vs Eknath Shinde news
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam TV Nws Marathi

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांच्यानंतर उद्धव ठाकरे दिल्लीत; पडद्यामागे काय राजकारण घडतंय?

uddhav thackeray delhi tour : एकनाथ शिंदे यांच्यानंतर उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Published on
Summary

एकनाथ शिंदे यांच्या उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर

उद्धव ठाकरे ३ दिवस दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत.

उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांशी भेटणार

उद्धव ठाकरे यांना राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भोजनाचं आमंत्रण देण्यात आलंय

राज्यात नव्या प्रभाग रचनेनुसार २७ टक्के इतर मागासवर्गीय आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकीकडे निवडणुकीचं बिगुल वाजल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. याच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे देखील इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील दोन्ही बड्या नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे यांचा आठवडाभरात दुसरा दिल्ली दौरा आहे. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शिंदेंनी अमित शहा यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे महायुतीत अस्वस्थ असल्याचाही चर्चा होती. याचदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्लीतील भेटींना राजकीय महत्व प्राप्त झालं आहे. 'अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली. काही खासदारांचे विषय होते, त्यावर चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde news
Local Body Polls 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

एकनाथ शिंदे यांच्यानंतर उद्धव ठाकरे देखील दिल्लीत असणार आहेत. ठाकरे तीन दिवस दिल्लीत असणार आहे. ठाकरेंच्या दौऱ्याआधी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वैदी यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार चतुर्वैदी यांच्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde news
Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढणार; विरोधकांचं टेन्शन वाढणार,VIDEO

उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील सोबत असणार आहे. दिल्ली दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भोजनाचे आमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. दिल्लीत इंडिया आघाडीची ७ तारखेला बैठकीला उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत ठाकरेंची बैठक होणार आहे. तसेच खासदारांसोबत देखील उद्धव ठाकरेंची बैठक होणार आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde news
Kolhapur Madhuri hatti : हिंदुस्तानी भाऊला कोल्हापुरी पायताणाने चोपणार; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, VIDEO

ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान शरद पवारांचीही भेट घेतली. उद्धव ठाकरे-राज ठाकरे युतीची चर्चा, राहुल गांधी यांच्यासोबत डिनर डिप्लोमसी यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com