Local Body Polls 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

Local Body Polls update : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट हाती आलीये. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
Local Body Election Update :
local body polls Saam tv
Published On
Summary

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट

आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली महत्वाची माहिती

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार

यंदा निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाहीत

अभिजीत सोनवणे,साम टीव्ही

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. यंदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाहीत. तसेच या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत महत्वाची माहिती दिली.

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीविषयी भाष्य केलं. दिनेश वाघमारे म्हणाले, 'निवडणूक टप्प्याटप्प्याने होणार आहे. 1 जुलै 2025 नुसार मतदार यादी आहे, त्या परवानगीनुसार मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. आता प्रारूप प्रभाग रचनानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

Local Body Election Update :
Nishikant Dubey on Thackeray Brothers : ठाकरे बंधू संपणार, मुंबईत केवळ 30 टक्के मराठी; निशिकांत दुबे पुन्हा बरळले, VIDEO

'सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्यानुसार काम केले जाते. ओबीसी आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमचे काम थोडे सोपे झाले आहे. मागील निवडणुकीतही ओबीसी आरक्षण होते. एससी एसटी आरक्षण हे ठरलेलं असतं. परंतु ओबीसी आरक्षण हे लॉटरी पद्धतीने काढले जाणार आहे, असे त्यांनी सांगितलं.

Local Body Election Update :
Life After Death : आता पुनर्जन्म घेणं शक्य होणार; 2 कोटी मोजा, पुनर्जन्म घ्या? वाचा स्पेशल रिपोर्ट

'दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबर अखेर नंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकसाठी व्हीव्हीपॅट मशीन राहणार नाही, असे आयुक्त वाघमारे यांनी सांगितलं.

Local Body Election Update :
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी; नव्या निर्णयाने भारताच्या अर्थव्यवस्थेला तडा जाणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com