Crime News
Crime NewsSaam tv

Nashik Crime: शाळकरी मुलीची वाट अडवली; भररस्त्यात रिक्षा चालकांनी मुलीला छेडलं, फोटोही काढले आणि मग..

School girl Harassment Nashik News: नाशकात एका शाळकरी मुलीची छेड काढण्याचा प्रकार घडला आहे. पीडित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे.
Published on

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दोन रिक्षाचालकांनी मुलीची छेड काढत तिचे काही फोटो काढले आहेत. नंतर तिला जबरदस्तीने नंबर देत तिला कॉल करायला सांगितले. मुलीने त्यांच्या तावडीतून पळ काढला आणि पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राज्यात बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नाशिकमध्येही एक संतापजनक घटना घडली. एका शाळकरी मुलीची दोन रिक्षाचालकांनी छेड काढली. भररस्त्यात तिची वाट अडवली. नंतर तिची छेड काढली. दोघांनी तिला त्यांचे कागदावर नंबर लिहून दिला. तसेच कॉल करण्यासही धमकी दिली.

Crime News
Kunal Kamra Memes: एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं, तामिळनाडूत लपला कामरा, वादात नेटकरी घेतायेत मज्जा

मोबाईल नंबर दिल्यानंतर आरोपी इतक्यावरच थांबले नाही. त्यांनी मुलीचे स्वत:च्या मोबाईलवर काही फोटोही काढले. पीडित मुलीने त्यांच्या तावडीतून पळ काढला. घर गाठत पालकांना याची माहिती दिली. पीडित मुलीने नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रारही दाखल केली.

पीडित मुलीच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित मुस्तफा शेख आणि अरबाज पठाण या दोघांना अटक केली. तसेच आरोपींविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयीतांकडून मोबाईल हस्तगत करण्यात आले असून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या रिक्षाचाही शोध पोलीस घेत आहे. या प्रकरणानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Crime News
Pune Crime: भयंकर! प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये अर्भक, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिलं, पुण्यात खळबळ

बेशिस्त मुजोर रिक्षाचालकांविरोधात पोलिसांची कारवाई

नाशिक शहरातील बेशिस्त आणि मुजोर रिक्षाचालकांविरोधात पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत ३,३४२ बेशिस्त आणि मुजोर रिक्षा चालकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये गणवेश न घालणाऱ्या तब्बल २,००० रिक्षाचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या तब्बल १,२०० रिक्षाचालकांवरही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com