Pune Crime: भयंकर! प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये अर्भक, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिलं, पुण्यात खळबळ

Daund infant remains found: दौंड शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृत अवस्थेतील अर्भक आढळले आहेत. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Pune
PuneSaam
Published On

पुण्यातील दौंड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दौंड शहरातील बोरावके नगर परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृत अवस्थेतील अर्भके सापडले आहेत. प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये हे अर्भके असल्याची माहिती आहे. शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भके सापडल्याने खळबळ उडाली आहे.

दौंड शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक सापडल्याने परिसरात गर्भपात होत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे सर्व अर्भक प्लास्टिकच्या डब्यात बंद केलेले असल्याचे आढळून आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी थेट घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस , सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील , पोलिस उपनिरीक्षक युवराज घोडके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.

Pune
CM Fadnavis: गोरे प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा हात, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर आरोप

त्यानंतर घटनेची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयांच्या डॉक्टरांना तात्काळ त्याठिकाणी बोलावून घेतलं. तसेच त्यांना अधिक तपास करायला सांगितलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Pune
Prasanna Shankar: 'XL साईजचं कंडोम आणा, हॉटेल बुक केलंय', उद्योगपतीच्या पत्नीचा कारनामा, 'असा' केला भंडाफोड

महिला आयोगाने घेतली दखल

दौंडच्या बोरावकेनगरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक आणि मानवी अवशेष सापडल्याची बातमी माध्यमातून समोर आली. सद्यस्थितीत दौंड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून डॉक्टरांच्या पथकामार्फत तपासणी केली आहे.

तपासादरम्यान, हे मानवी अवशेष रुग्णालयाकडे अभ्यासासाठी २०२० पासून आहेत आणि आता नजरचुकीने कचऱ्यात गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्य महिला आयोग तातडीने तपास पूर्ण करण्याच्या सूचना देत वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com