
स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या त्याच्या वादग्रस्त कवितेमुळे चर्चेत आहे. खार येथील हॅबिटॅट क्लबमध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं. ज्यामुळे शिवसैनिकांची माथी भडकली आणि त्यांनी हॅबिटॅट कल्बवर हल्ला केला.
या घटनेनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कुणाल कामरावर विविध प्रकारचे मीम्स तयार केले आहेत. काही नेटकऱ्यांनी कुणाल कामराला समर्थन दर्शवलं आहे. तर, काहींनी विरोध केला आहे.
एक्सवर एक मीम व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेता बॉबी देओलच्या एका चित्रपटाचा सीन दिसत आहे. बॉबी देओल घरात येतो. त्यानंतर दरवाजा लावून प्रत्येक कड्या लावतो. या व्हिडिओ मीमसारखी कुणाल कामराची अवस्था झाली आहे, असं नेटकऱ्याने म्हटलं आहे.
जर पोलिसांना कुणाल कामरा रस्त्यावर दिसला तर, त्याची काय अवस्था होईल, या संदर्भात एक मीम तयार करून तो नेटकऱ्याने शेअर केला आहे. यात कामराची खिल्ली उडवली आहे.
यानिमित्ताने समय रैनाचाही मीम व्हायरल होत आहे.
हॅबिटॅट क्लबवर व्हायरल मीम
नेमकं प्रकरण काय?
कुणाल कामरा सध्या त्याच्या वादग्रस्त गाण्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याने हॅबिटॅट कल्बमध्ये कॉमेडी शो दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून सादर केलं. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही गाणं तयार केलं. यामुळे समर्थकांनी याचा निषेध केला. शिवसैनिकांनी त्याच्या खार येथील स्टुडिओची तोडफोड केली.
या घटनेनंतर कुणालने माफी न मागण्याची भूमिका दर्शवली. या गदारोळानंतर कामराचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्टुडिओच्या तोडफोडीनंतर त्याने हे गाणं सादर केला आहे. 'हम होंगे कंगाल' असे गाण्याचे बोल असून, सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.