Nashik News: नाशिक-मुंबई महामार्गावर हत्येचा थरार, उत्तर महाराष्ट्र केसरी विजेत्याची गोळ्या झाडून हत्या

Bhushan Lahamage Shot Dead: नाशिकजवळ उत्तर महाराष्ट्र केसरी विजेत्याची हत्या करण्यात आली आहे. नाशिक - मुंबई महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ ही घटना घडली. भूषण लहामागे (Bhushan Lahamage) असे हत्या झालेल्या उत्तर महाराष्ट्र केसरीचे नाव आहे.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam tv

अभिजीत सोनावणे, नाशिक

नाशिकमध्ये (Nashik) उत्तर महाराष्ट्र केसरी विजेत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर (Nashik -Mumbai Highway) दिवसाढवळ्या हत्येची ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी (Nashik Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकजवळ उत्तर महाराष्ट्र केसरी विजेत्याची हत्या करण्यात आली आहे. नाशिक - मुंबई महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ ही घटना घडली. भूषण लहामागे (Bhushan Lahamage) असे हत्या झालेल्या उत्तर महाराष्ट्र केसरी विजेत्याचे नाव आहे. कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भूषण लहामागेवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या भूषण लहामागेचा जागीच मृत्यू झाला.

Nashik Crime News
Navi Mumbai Accident : पुढच्या महिन्यात मर्चंट नेव्हीमध्ये जॉइन होणार होता, पण त्याआधीच नियतीनं डाव साधला! १९ वर्षांच्या तरुणासोबत काय घडलं?

नाशिक - मुंबई महामार्गावर भर दिवसा या हत्येचा थरार रंगला होता. त्यामुळे याठिकाणावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. घटनास्थळी सध्या गोंधळाचे वातावरण असून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भूषणचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पूर्व वैमनस्यातून भूषण लहामागेची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या नाशिक पोलिस या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Nashik Crime News
Pune Loksabha: रविंद्र धंगेकरांच्या नावाने साडीवाटप करणे भोवले, भरारी पथकाकडून एकावर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com