Pune Loksabha: रविंद्र धंगेकरांच्या नावाने साडीवाटप करणे भोवले, भरारी पथकाकडून एकावर गुन्हा दाखल

Pune Breaking News: साड्यांचे वाटप तसेच विनापरवाना बॅनरबाजी केल्याचे एका समर्थकाला चांगलेच महागात पडले आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर भरारी पथकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Breaking News:
Pune Breaking News: Saamtv

सचिन जाधव, पुणे|ता. १० मे २०२४

पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या नावाने साड्यांचे वाटप तसेच विनापरवाना बॅनरबाजी केल्याचे एका समर्थकाला चांगलेच महागात पडले आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर भरारी पथकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यात सध्या लोकसभेचे धुमशान सुरू आहे. निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा साडी वाटप, पैसे वाटप केले जाते. पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या नावाने साडी वाटप करणे त्यांच्या समर्थकाला चांगलेच महागात पडले आहे.

निवडणुक भरारी पथकाकडून याप्रकरणी रविंद्र धंगेकर यांच्या समर्थकावर दत्तवाडी पाेलीस ठाण्यात निवडणुक आचारसंहिता उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचेकडे भाजपच्या कार्यकर्त्या माधवी निगडे यांनी लेखी तक्रार केली आहे.

Pune Breaking News:
Ajit Pawar: 'पवार साहेब असं स्टेटमेंट करतात की डोकं खाजवायला लावतात', अजित पवार पुन्हा बोलले; नेमकं काय म्हणाले?

तक्रारीनुसार काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची हिंदमाता प्रतिष्ठान संस्था आहे. हिंदमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे शहरातील लाेकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारे विविध विधानसभा मतदारसंघात संत महंत व शक्ती पीठाचे पादुकांचे दर्शनाचे व महाप्रसादचे कार्यक्रम आयाेजित केले होते. या कार्यक्रमामध्ये साडी वाटप झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्यानंतर निवडणूक आयोगाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Pune Breaking News:
Satara News: रक्षा विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाश्यांचा हल्ला; ७० जण गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com