Satara News: रक्षा विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाश्यांचा हल्ला; ७० जण गंभीर जखमी

Satara Breaking News: नागरिकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवल्याची घटना साताऱ्याच्या ढेबेवाडी परिसरात घडली. या हल्ल्यामध्ये ७० जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर सध्या कराडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Satara News: रक्षा विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाश्यांचा हल्ला; ७० जण गंभीर जखमी
Chhatrapati Sambhajinagar NewsSaamtv
Published On

सातारा, ता. १० मे २०२४

रक्षा विसर्जन करणेसाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवल्याची घटना साताऱ्याच्या ढेबेवाडी परिसरात घडली. या हल्ल्यामध्ये ७० जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर सध्या कराडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी विभागात मधमाशांनी नागरिकांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ढेबेवाडी भागातील मराठवाडी गावात नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीजवळ काही नागरिक रक्षा विसर्जन करण्यासाठी गेले होते. याचवेळी जवळच असलेल्या मधमाश्यांनी या सर्वांवर हल्ला चढवला.

अचानक झालेल्या या हल्ल्याने सर्वजण घाबरुन गेले. या हल्ल्यामध्ये ७० नागरिक जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर कराड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Satara News: रक्षा विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाश्यांचा हल्ला; ७० जण गंभीर जखमी
Akola Crime News: प्रेमात अडसर ठरत होती बायको; नवऱ्याने गाठला विकृतीचा कळस, मित्राच्या मदतीने बनवले अश्लील व्हिडिओ

दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रमात, गर्दीच्या ठिकाणी मधमाश्यांनी हल्ला केल्याची ही एकाच आठवड्यातील चौथी घटना आहे. याआधी बुलढाण्यातही डी. जे च्या आवाजामुळे चवताळलेल्या मधमाश्यांनी वऱ्हाडी मंडळींवर हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यामध्ये १० जण जखमी झाले होते.

Satara News: रक्षा विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाश्यांचा हल्ला; ७० जण गंभीर जखमी
Kalyan News: 'राजकारणातून संन्यास घ्यायचा, नाहीतर संपवून टाकेन...' शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com