Nashik News: नाशिक शहराची ओळख आता 'बिबट्यांचं शहर'

Nashik News नाशिक शहराची ओळख आता 'बिबट्यांचं शहर'
Nashik News Leopard
Nashik News LeopardSaam tv
Published On: 

तबरेज शेख 
नाशिक
: धार्मिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक, द्राक्ष पंढरी अशी ओळख असलेल्या नाशिकची आता 'बिबट्यांचे शहर' म्हणून ओळख होऊ लागली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. (Nashik) नाशिक शहरात दिवसाआड बिबट्या कुठे ना कुठे दिसतोय. नागरी वसाहतीत बिबट्या (Leopard) शिरल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली राहत आहे. नाशिक रोड परिसरात बिबट्या दिसत असल्याने नागरिक संध्याकाळी घराबाहेर पडत नाहीये. (Breaking Marathi News)

Nashik News Leopard
Nandurbar Accident News: दुचाकीची धडक देत कार कोसळली नाल्यात; लहान मुलीसह ५ जखमी

प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेलं नाशिक धार्मिक नगरी, ऐतिहासिक नगरी, द्राक्ष पंढरी, कुंभ नगरी अशी वेगवेगळी ओळख या नाशिकची आहे. मात्र आता याच वाइन कॅपिटलची ओळख लेपर्ड सिटी नावाने होऊ लागलीय. दिवसाआड बिबट्याचे दर्शन बघायला मिळत आहे. शहरातील नाशिक रोड परिसरात असलेल्या जयभवानी रोड या ठिकाणी बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलय. चुकीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असल्याने वनविभागासह रहिवाशांच्याही नाकीनऊ आले आहे. भालेराव मळ्यातील एका झाडावर बिबट्या बसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे या परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आले. 

Nashik News Leopard
Beed Health Recruitment Scam: आरोग्य भरती घोटाळ्यात शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा सहभाग; मनसेचे अशोक तावरे यांचा आरोप

दहशतीखाली वावर 

अगदीच पालक विद्यार्थ्यांना शाळेत व ट्युशनसाठी देखील पाठवताना घाबरू लागले आहेत. शतपावलीसाठी जाणाऱ्यांनी देखील सकाळी बाहेर पडणे बंद केले. कामानिमित्त घराबाहेर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी देखील बिबट्याच्या दहशतीने परिसरात येण्याजाण्याचे कमी केले. यामुळे या ठिकाणावरील दैनंदिन जीवनमानावर परिणाम झाल्याचे दिसून आले. अनेक नागरिक परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या संभ्रमात दिसून आले. तर अनेक नागरिकांनी बिबट्या फिरत असल्याने तात्काळ (Forest Department) वनविभागाने कारवाई करावी अशी मागणी केलीय. एकूणच काय तर नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरताना दिसतय. सकाळी उजेड झाल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही, तर रात्री लवकर घरात जायचे असा दिनक्रम नागरिकांनी सुरू केलाय

Nashik News Leopard
Wardha News : वन्यप्राण्यांचा त्रास; बंदोबस्ताच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक

आता व्हिडीओ, फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई 
बिबट्या झाडावर बसल्याचा फोटो परिसरात व्हायरल झाल्यानंतर या भागात वन विभागाच्या पथकाने तात्काळ धाव घेतली. वनविभागाचे पथक पूर्ण तयारीत परिसरात दाखल झाले. पथकाने परिसरात शोधाशोध केली; या व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे वनविभागाचे पथक देखील गोंधळात पडलं. यावेळी वन अधिकाऱ्यांनी देखील हा फोटो या संपूर्ण परिसरातील नसल्याचे नागरिकांना पटवून सांगितले. नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असल्याने परिसरात बिबट्या फिरतोय; अशा अफवा पसरविणाऱ्यांवर व अन्य ठिकाणांचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियाद्वारे व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात असा थेट इशाराच उपवनरक्षक पंकज गर्ग यांनी दिला.

नाशिक रोड परिसराला लागूनच लष्कराचे आर्टिलरी सेंटर आहे. या ठिकाणी घनदाट जंगलाचा परिसर आहे. त्यामुळे भक्ष आणि पाण्याच्या शोधात बिबट्या कधीकधी बाहेर येतात. खरे पण काही भेटल नाही तर परत निघून जातात. परंतु काही दिवसांपासून शहरात नागरी वस्तीत बिबट्या वावरत असल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली तर राहताय. परंतु कधीकाळी जंगलांमध्ये वास्तव्य करणारे बिबटे आता मानवी वसाहतीत शिरत असल्याने नाशिक शहराची ओळख लेपर्ड सिटी म्हणून होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com