Wardha News : वन्यप्राण्यांचा त्रास; बंदोबस्ताच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक

Wardha News वन्यप्राण्यांचा त्रास; बंदोबस्ताच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक
Wardha News
Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास
वर्धा
: वर्धेच्या देवळी येथील तहसील कार्यालयावर युवा संघर्ष मोर्चा या संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धडक दिली. यावेळी वन्यप्राण्यांचा (wildlife) तातडीने बंदोबस्त करा; यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार सचिन यादव यांना देण्यात आले. मोर्च्यात शेकडोच्या संख्येत (Farmer) शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (Maharashtra News)

Wardha News
Nandurbar Accident News: दुचाकीची धडक देत कार कोसळली नाल्यात; लहान मुलीसह ५ जखमी

देवळी (Wardha) तालुक्यात वन्यप्राण्यांनी चांगलाच हैदास घातला आहे. शेतकऱ्यांवर हल्ले करने, शेती पिकांचे नुकसान करने ही नित्याचीच बाब झाली आहे. जंगली जनावरांच्या त्रासाने शेतकरी त्रस्त झाला आहे. एवढंच नव्हे तर जंगली जनावरांनी केलेल्या नुकसानीची मदतही शेतकऱ्यांना मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कागदाची जुळवाजूळव करावी लागते. या सर्व गोष्टीने त्रस्त होऊन शेतकऱ्यांनी युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात आंदोलन केले. 

Wardha News
Beed Health Recruitment Scam: आरोग्य भरती घोटाळ्यात शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा सहभाग; मनसेचे अशोक तावरे यांचा आरोप

तीव्र आंदोलनाचा इशारा 

वर्धा शहराच्या मुख्य मार्गाने निघालेला मोर्चा देवळीच्या तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदाराना निवेदन देत वन विभागाने वन्यप्राण्यांचा पंधरा दिवसात तातडीने बंदोबस्त करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल; असा इशारा यावेळी देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com