Maharashtra Politics: राजकारणात मोठी उलथापालथ, शिंदेंनी घेतली थेट उपमहापौरपदाची शपथ

BJP Shinde Sena Political Alliance In Nashik: महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडीत ऐनवेळी राजकीय नाट्य रंगले. शिंदे गट सत्तेत सहभागी होत उपमहापौरपदावर विराजमान झाला.
Shiv Sena (Shinde faction) leader taking oath as Deputy Mayor amid dramatic political developments in Nashik.
Shiv Sena (Shinde faction) leader taking oath as Deputy Mayor amid dramatic political developments in Nashik.Saam Tv
Published On

महापालिका निवडणुकीच्या दरम्यान शिंदेसेनेला डावलून भाजपने नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढवली होती. तर शिंदेसेना आणि दिवंगत अजित पवारांची राष्ट्रवादीने युती करून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी दोघांचे एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप देखील पाहायला मिळाले. मात्र निवडणूक होताच शिंदेसेना आणि दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला.

दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्व नगरसेवकांची बैठक घेत महापौरपदी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी मच्छिंद्र सानप यांचे नाव जाहीर केले. मात्र यानंतर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला. महापौरपदासाठी संख्याबळ नसताना शिवसेना ठाकरे गटाकडून सीमा पवार तर उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रवीण तिदमे, विलास शिंदे आणि राहुल दिवे यांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपदाची निवड बिनविरोध होणार नाही असे मानले जात होते.

पण शुक्रवारी महापौर निवड प्रक्रिया सुरू झाल्यावर नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सीमा पवार यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आहेर आडके यांची बिनविरोध निवड झाली. तर ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाला हायकमांडकडून सत्तेत सहभागी होण्याचे आदेश आल्याने उपमहापौरपदासाठी विलास शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. तर प्रवीण तिदमे आणि राहुल दिवे यांनी उमेदवारी मागे घेतली. तसेच भाजपचे उपमहापौरपदाचे उमेदवार मच्छिंद्र सानप यांनीही उमेदवारी घेतल्याने शिंदे गटाचे विलास शिंदे यांचा रस्ता अधिक सोपा झाला. तर राष्ट्रवादी आणि मनसेने भाजप शिंदेसेनेला पाठिंबा देत सत्ताधारी बाकांवर बसने पसंत केले.

Shiv Sena (Shinde faction) leader taking oath as Deputy Mayor amid dramatic political developments in Nashik.
Nashik Mayor: ठरलं तर मग! नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार, विरोधात लढलेली शिंदेसेना सत्तेत बसणार

ऐनवेळी नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ दिसून आली. शेवटच्या क्षणापर्यंत महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार हे बदलतांना दिसले. नाशिक महपालिका निवडणूक ही विविध कारणांनी गाजली होती.निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना तिकीट दिल्याने भाजपच्या आमदार देवयांनी फरांदे ह्या पत्रकार परिषदेत रडल्या. भाजप कार्यालयाबाहेर झालेला राडा, बी फॉर्मवरून गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग, बंडखोरी अशा विविध कारणांनी ही निवडणूक झाल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com