नाशिक महानगरपालिकेच्या सिडको प्रभाग समितीच्या सभेत आज मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाला. शहरातील दूषित पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरून अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही नगरसेवकांनी भर सभेत एकमेकांना जाहीरपणे शिवीगाळ केली,यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला.
शहरातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा मुद्दा सभेत उपस्थित करण्यात आला होता. यावेळी अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आक्रमक पवित्रा घेत, दूषित पण्याचीब बाटली सभापतीना देण्याऐवजी थेट संबंधित अधिकाऱ्यांनाच दिली पाहिजे, जेणेकरून त्यांना समस्येची जाणीव होईल, अशी भूमिका मांडली. तर मुकेश शहाणे बोलत असताना भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी त्यांना रोखल. इतर नगरसेवकांनाही त्यांचे प्रश्न मांडू द्या असे म्हणत बडगुजर यांनी शहाणे यांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.
बोलण्यावरून टोकलेल्या या क्षुल्लक कारणावरून दोन्ही नगरसेवकांमधील वाद थेट वैयक्तिक पातळीवर गेला. दोघांनीही एकमेकांवर अत्यंत खालच्या भाषेत बोलत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. लोकप्रतिनिधींनी भर सभागृहात एकमेकांना शिव्या दिल्याने उपस्थित अधिकारी आणि इतर नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.
यावेळी महिला नगरसेवकांसमोर अशा शिवराळ भाषेत बोलल्याने नगरसेविका ह्या आक्रमक झाल्या होत्या. विशेष म्हणजे हे सगळे सुरू असताना मागे पालिकेमधील सुरक्षा रक्षक असूनही त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. जर लोकप्रतिनिधीच जर असे शिवराळ भाषेत बोलत असेल तर त्यांच्याकडून शहरातील विकासाची काय अपेक्षा करायची असा सवाल नागरिक विचारत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.