Kumbh Mela Tender Scam: जळगावात कुंभमेळा बोगस टेंडरचा छापखाना; बिंग कसं फुटलं? घोटाळ्याची इनसाईड स्टोरी

Kumbh Mela Tender Scam: कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात मोठा कारनामा समोर आलाय. कुंभमेळ्यातील घोटाळ्याचा प्लॅन कसा रचण्यात आला? आणि टेंडरसाठी बनावट वर्क ऑर्डर कुठे छापण्यात आल्या? पाहूयात हा विशेष रिपोर्टमधून.
KUMBH MELA FAKE TENDER SCAM JALGAON PRINTING PRESS EXPOSED
KUMBH MELA FAKE TENDER SCAM JALGAON PRINTING PRESS EXPOSEDsaam tv
Published On
Summary
  • कुंभमेळ्यातील बोगस टेंडर घोटाळा जळगावात कसा उघडकीस आला

  • कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात मोठा खुलासा

  • या प्रकरणाचा धागा जळगावातील एका छापखान्यापर्यंत पोहोचल्याचा दावा

महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या टेंडरसाठी बनावट वर्क ऑर्डर काढल्याचा मोठा घोटाळा उघड झालाय. याचं जामनेर कनेक्शन आधीच समोर आलेलं असताना याबाबत आणखी एक कारनामा जळगावात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या संपूर्ण प्रकरणाची धक्कादायक इनसाईड स्टोरी साम टीव्हीच्या हाती लागलीय. आरोपींनी जळगावच्या छापखान्यात य़ा बनावट वर्क ऑर्डर छापल्याचा पर्दाफाश झालाय. नेमका कसा सुरू होता हा घोटाळा पाहूयात.

KUMBH MELA FAKE TENDER SCAM JALGAON PRINTING PRESS EXPOSED
Girish Mahajan: गिरीश महाजनच नाशिकचे पालकमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

कुंभमेळा टेंडर घोटाळ्याची इनसाईड स्टोरी

बनावट वर्क ऑर्डर जळगावमधील आईसाहेब आर्ट प्रिंटिंग प्रेसमध्ये तयार

फिर्यादींचा विश्वास बसावा यासाठी नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात भेटण्यास बोलावलं

आयुक्त कार्यालयाच्या परिसरात फिर्यादींना कामाच्या कंत्राटाची कागदपत्रं दाखवली

भारतीय राजमुद्रा असलेलं, आयुक्तांची सही असलेली टेंडरची कागदपत्रं दाखवली

टेंडरच्या मोबदल्यात एकूण रकमेच्या 8% आम्हाला आणि 2% अधिकाऱ्यांसाठी आगाऊ रकमेची मागणी

तनय महाजनच्या खात्यात 2 कोटी 72 लाख आल्याचा संशय

नरेंद्र महाजननं रोख स्वरुपात 36 लाख 50 हजार घेतल्याचा आरोप

शकील शेखच्या बँक खात्यातही 86 लाख 50 हजार आल्याची माहिती

नातेवाईकांसह मित्रांच्या बँक खात्यांचाही पैशांच्या व्यवहारासाठी वापर

टेंडरच्या अनुषंगानं व्यावसायिक भागीदारीची नोटरीही केली

आरोपींनी टेंडरचं अॅग्रीमेंट करण्यास टाळाटाळ केल्यानं बिंग फुटलं

KUMBH MELA FAKE TENDER SCAM JALGAON PRINTING PRESS EXPOSED
खड्ड्यांवरून नाशिकमध्ये राजकारण तापलं, भुजबळांनी कुंभमेळा मंत्री महाजनांना सुनावलं

दरम्यान कुंभमेळ्याच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी होत असून भ्रष्टाचारासाठी भरघोस निधीची तरतुद करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. सिंहस्थ कुंभमेळा हा हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा उत्सव आहे.

याच्या नावाखाली नावाखाली बनावट वर्क ऑर्डर काढून लुटालूट सुरू असताना सत्ताधारी नेते आणि कुंभमंत्री म्हणवून घेणारे नेमकं काय करत होते? सहा आरोपींना आता याप्रकरणात अटक झाली असली तरी या घोटाळ्यामागील खरा मास्टरमाईंड कोण आहे? जनतेच्या करातून येणाऱ्या पैशांची अशा पद्धतीनं होणाऱ्या लुटीला नेमका कुणाचं अभय आहे? असे असंख्य प्रश्न जनतेचा मनात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com