भावली डॅमला कपडे बदलताना महिलेशी अश्लील वर्तन; पीडितेने सांगितली अंगावर काटा आणणारी आपबीती

Nashik Bhavali Dam Molestation Case Full Story: नाशिकच्या इगतपुरीतील भावली धरण परिसरात महिलेशी छेडछाड करून कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपींनी 30 किमी पाठलाग करत गाडीची तोडफोड केली. पोलिसांकडून तपास सुरू.
Bhavali Dam incident site in Nashik where a tourist family was attacked and chased by miscreants
Bhavali Dam incident site in Nashik where a tourist family was attacked and chased by miscreantssaam tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाजवळील धबधबा परिसरात रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी गेलेल्या नाशिकरोड येथील एका कुटुंबावर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 आज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. हल्लेखोर टवाळखोरांनी महिलेचा विनयभंग करत मोबाइल आणि सोनसाखळी हिसकावली. ही सगळी आपबीती सदर पीडितेने सांगितली.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, छेडछाडीतून सुरू झालेला वाद पुढे 20 ते 30 किलोमीटरपर्यंत पाठलाग, गाडीवर हल्ला आणि दहशतीत रूपांतरित झाला. पीडित महिला आणि तिचे कुटुंब रविवारी फिरण्यासाठी गेले होते. दुपारी सुमारे 2 वाजता ते भावली डॅमला पोहोचले. मुलं खेळत असताना महिला कपडे बदलण्यासाठी गेली असता दोन तरुणांनी तिच्यावर अश्लील कमेंट्स केल्या. महिलेनं दुर्लक्ष केलं, मात्र त्यांनी पुन्हा कमेंट केल्याने तिचे पती तिथे आले आणि जाब विचारला. त्यानंतर परिस्थिती चिघळली.

Bhavali Dam incident site in Nashik where a tourist family was attacked and chased by miscreants
Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांना पक्षातून आव्हान, राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; थेट नोटीस बजावली

महिलेच्या म्हणण्यानुसार, जवळच्याच दुकानासमोर 8 ते 10 जणांची टोळी उभी होती. त्यांनी पती-पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक बलेनो कार आली आणि त्यातील व्यक्तीने त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. पुढे जात असताना टोळीने त्यांचा पाठलाग सुरू ठेवला.भावली डॅम परिसरात प्रथम हल्ला करण्यात आला. त्यानंतर टोलनाक्यावर पुन्हा हल्ला झाला. रॉडने गाडीवर प्रहार करण्यात आले, तसेच दगडफेकही करण्यात आली. जीव वाचवण्यासाठी कुटुंबाने बॅरिकेड्स तोडून गाडी पुढे काढली. मात्र आरोपी सतत पाठलाग करत राहिले.

Bhavali Dam incident site in Nashik where a tourist family was attacked and chased by miscreants
MHADA Lottery : खुशखबर! म्हाडाच्या ५००० घरांची लॉटरी लवकरच, तारीख आली समोर; कुठे किती घरं असणार?

दरम्यान, एक आरोपी त्यांच्या गाडीला लटकला होता, त्यामुळे गाडी थांबवणंही शक्य नव्हतं. मागून बलेनो कार सतत पाठलाग करत होती. स्थानिक लोक दिसल्यानंतर कुटुंबाने मदत मागितली, मात्र त्याचवेळी एका आरोपीने महिलेला धरलं आणि त्या गोंधळात तिची सोन्याची चेन हरवल्याचंही सांगितलं. या थरारक प्रसंगानंतर कुटुंब थेट अंबड पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी झिरो FIR दाखल केली असून काल घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. सुरक्षेसाठी पोलिसांनी कुटुंबाला दोन गाड्यांचा ताफा दिला आहे.

Bhavali Dam incident site in Nashik where a tourist family was attacked and chased by miscreants
SSC - HSC Exam : १०वी १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! पुरवणी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर; वाचा A to Z अपडेट्स

पीडित महिलेने संताप व्यक्त करताना सांगितलं की, या गुंडांना महिला, मुलं काहीच दिसत नव्हतं. आम्ही थांबलो असतो तर काय झालं असतं, सांगता येत नाही. जवळपास 30 किलोमीटर आम्ही मृत्यूचा सामना करत आलो. तसंच, केस दाखल करू नका म्हणून अज्ञात व्यक्तीकडून 10 लाख रुपयांची ऑफर आल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून एक आरोपी पालघरच्या दिशेने फरार झाला आहे. असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com