नाशिकमधील धक्कादायक घटना; 22 मृत रुग्णांवर 6 वर्षानंतर उपचार; 3 हॉस्पिटल्सनं शासनाला लावला 2 कोटींचा चुना

Nashik hospital scam: नाशिकमध्ये आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सुमारे २ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन रुग्णालयांच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik hospital scam involving Rs 2 crore government health scheme claims
Nashik hospital scam involving Rs 2 crore government health scheme claimssaam tv
Published On: 
Summary
  • नाशिकमधील तीन रुग्णालयांवर २ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

  • कोरोना काळात मृत झालेल्या २२ रुग्णांच्या नावाने उपचारांचे दावे

  • आयुष्मान भारत योजनेतील कथित घोटाळा नाशिकमध्ये उघड

कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या 22 रुग्णांवर तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा केल्याचं सांगत शासनाला 2 कोटी रुपयांचा गंडा घातलाच प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय. आयुष्मान भारत योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या नावाखाली हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आलाय. याप्रकरणी नाशिकमधील तीन नामांकित रुग्णालयांच्या संचालकांवर मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कोरोना काळात ज्या 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता, ते रुग्ण जिवंत असल्याचे दाखवून त्यांच्या नावावर तब्बल 6 वर्षांनंतर शासकीय योजनांतर्गत खोटे क्लेम दाखल करण्यात आले. या तिन्ही रुग्णालयांनी वैद्यकीय कागदपत्रांमध्ये हेरफेर करत शासनाकडून सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी या हॉस्पिटल्सनं लाटला.

Nashik hospital scam involving Rs 2 crore government health scheme claims
Earthquake: मोठी बातमी! गणपतीच्या आरतीवेळीच नाशिक थरारलं, भूकंपानं जमिनीला पडल्या मोठ्या भेगा, नागरिक दहशतीखाली

विधानमंडळाच्या अधिवेशनात आमदार डॉ. राहुल आहेर यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित केला होता. या घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आलीय.

Nashik hospital scam involving Rs 2 crore government health scheme claims
Pune : पैशांसाठी ढसाढसा रडला, उत्तर प्रदेशच्या तरुणाने पुण्यात स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला

या एसआयटीकडून या संपूर्ण प्रकरणाचा स्वतंत्र आणि सखोल तपास सुरूय. मृत रुग्णांच्या नावावर बोगस क्लेम करून निधी लाटणाऱ्या या रॅकेटमध्ये केवळ रुग्णालयांचे संचालकच नव्हे, तर आरोग्य विभागातील आणि शासकीय यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचारी सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे येत्या काळात या घोटाळ्यात आणखी काही रुग्णालये आणि बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com