- तबरेज शेख
Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर निवडणुकीतून आज धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांनी माघार घेतली आहे. पक्ष हितासाठी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाधव यांनी नमूद केले. भाजप (bjp) पक्ष ज्याला पाठींबा देईल त्या उमेदवारास निवडून आणण्यास आम्ही प्रयत्न करु असेही जाधव यांनी स्पष्ट केले. (Breaking Marathi News)
भाजप कार्यकर्ते धनंजय जाधव यांनी नाशिक (nashik) पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरला हाेता. जाधव यांनी पक्ष एबी फाॅर्म देईल अशी अपेक्षा हाेती. मात्र तसे झाले नाही. धनंजय जाधव हे मंत्री विखे पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी आज पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतून माघार घेतली. (Maharashtra News)
ते म्हणाले पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आणखी चांगल्या उमेदवा-यास मदत करण्यासाठी व पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आलेल्या आदेशाचे पालन म्हणून मी निवडणुकीतून (election) माघार घेतली आहे. क्रीडामंत्री गिरीश महाजन आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानंतर मी माघारीचा निर्णय घेतला. पक्ष सांगेल त्याला आपण मदत करणार आहाेत असेही धनंजय जाधव यांनी स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.