अभिजीत सोनवणे साम टीव्ही, नाशिक
नाशिक जिल्ह्यात पाणीबाणी (Water Shortage) वाढली आहे. जिल्ह्यामध्ये २३८ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तीव्र उष्णतेच्या झळांमुळे एप्रिलमध्येच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यामध्ये एकूण २४ धरण प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये अवघा २८.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. नाशिकमध्ये पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. (Latest Marathi News)
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या उष्णतेचा पारा लक्षात घेता, त्या पाण्याचं बाष्पीभवन होण्याचा वेग देखील वाढण्याची शक्यता (Nashik Water Shortage) आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पाण्याची समस्या आणखी गंभीर होणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाची देखील चिंता वाढत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सद्यस्थितीत २३० गावं आणि ४७७ वाड्यांना २३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गावांसाठी १२ तर टँकर्ससाठी ९९ अशा १११ विहिरीचं प्रशासनाकडून अधिग्रहण करण्यात आलेलं आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक टॅंकर (Nashik District Water Crisis) आहेत. त्या टॅंकरची संख्या ४९ आहे. आगामी काळात पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची चिन्हं दिसु लागली आहेत.
नाशिक जिल्ह्यातील अनेक वाड्या वस्त्यांमध्ये पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. अनेकदा त्यांना हंडाभर पाण्यासाठी अनेक किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. यंदा कमी पाऊस पडल्यामुळे सर्वत्र पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत (Water Crisis News) आहे. पाणीसाठ्यांमध्ये देखील कमी पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच प्रचंड हाल आहेत.
पावसाळा सुरू होण्यासाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्याअगोदरच पाणीटंचाईच्या तीव्र झळांनी (Nashik News) नागरिक त्रस्त झाले आहेत. एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र जिल्ह्यात दिवसेंदिवस चारा आणि पाण्याची स्थिती गंभीर होत चालली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.