Pandharpur Water Crisis: ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट! पंढरपूर आणि सांगोल्यात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा

Maharashtra Rain Updates: राज्यातील काही भागात पावसाच्या दमदार हजेरीने बळीराजा सुखावलेला असताना काही भागात मात्र अद्याप पावसाने दडी मारली आहे.
Pandharpur Sangola Water Crisis
Pandharpur Sangola Water Crisissaam tv
Published On

Sangola Pandhapur Rain Crisis: एकीकडे राज्यातील काही भागात पावसाच्या दमदार हजेरीने बळीराजा सुखावलेला असताना काही भागात मात्र अद्याप पावसाने दडी मारली आहे. त्यामुळेच राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळाची छाया गडद होत आहे. पंढरपूर, सांगोला भागात पावसाने पाठ फिरवल्याने पाणी कपातीचे संकट ओढावले आहे.

Pandharpur Sangola Water Crisis
Nashik Rain Crisis: वरुणराजा बरसेना.. नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट; बळीराजा चिंतेत

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंढरपूर, सांगोला भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे सांगोला भागातील ८१ गावाची पाणीपुरवठा योजना तसेच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत. पाणी साठा कमी असल्याने या भागात उद्यापासून पाणी कपात केली जाणार आहे.

या भागात ऑगस्ट संपत आला तरी समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे पंढरपूर आणि सांगोल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चंद्रभागा बंधाऱ्यात केवळ ८ दिवसाचा पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे . त्यामुळे उद्यापासून शहरात सुरुवातीला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली जाणार आहे.

Pandharpur Sangola Water Crisis
Ahmednagar News: टोमॅटोनंतर कांद्याचे भाव पाडल्याबद्दल मोदी सरकारचे आभार; अहमनगरमध्ये झळकले बँनर्स

नाशिककरांवरही दुष्काळाचे सावट

पावसाने पाठ फिरवल्यामुळे नाशिकरांची (Nashik) चिंता वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाच्या सरासरीच्या ३८ टक्के तूट आहे. त्यामुळेच पावसाळा सुरू होऊन २ महिने उलटले तरी अनेक भागात खरिपाच्या पेरण्या रखडल्याचे चित्र दिसत आहे. तसेच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटही ओढावले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com