सुशील थोरात
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा या गावात एक बोर्ड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शेतकऱ्यांनी (Farmer) संतप्त भावना मांडून मोदी सरकारचे अभिनंदनाचा असलेला हा बोर्ड सध्या (Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यात चांगला चर्चेचा विषय झाला आहे. (Maharashtra News)
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यापूर्वी टोमॅटोचे भाव सुद्धा केंद्र सरकारमुळे कमी केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असून या भावनेला मोकळी वाट करून देत अज्ञात लोकांनी पारनेर तालुक्यातील जवळा या गावात मुख्य बाजारपेठेत मोदी सरकारचे अभिनंदन करण्याचा बोर्ड लावला आहे.
काय आहे या बँनरवर
'टोमॅटोचे भाव पाडल्यानंतर कांद्याचे (Onion) भाव पडण्यासाठी तातडीच्या प्रयत्नाबद्दल मोदी सरकारचे तमाम शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार' अशा आशयाचा फलक चर्चेचा विषय ठरला. नवीन हिटलर शाही असाही मजकूर या फ्लेक्स बोर्डवर लावण्यात आल्यामुळे हा बोर्ड सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. फ्लेक्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र हा बोर्ड भाजपच्या कार्यकर्त्यांनी तातडीने काढून टाकला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.