संजय सूर्यवंशी
नांदेड : गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक राहिल्याने मूर्ती कारागीर देखील गणरायाच्या मुर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत. नांदेडमध्ये तयार होणाऱ्या मुर्तीना दरवर्षी प्रमाणे यंदा ही तेलगंणा राज्यात मागणी वाढली आहे. दरवर्षी नांदेड जिल्ह्यातून ६० टक्के गणरायाच्या मुर्तीची विक्री तेलगंणा राज्यात होतं असते. (Live Marathi News)
आगामी १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात गणेश उत्सवाचा उत्साह असतो. अकरा दिवस भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा साजरा केला जातो. तेलगंणा राज्यातील निझामाबाद, आदिलाबाद, कामारेड्डी, बोधन, भैसा, आरमूर आदी ठिकाणी नांदेडच्या बाप्पाच्या मुर्तीना मागणी असते. शहरातील गाडीपूरा, कौठा, सिडको या भागात मोठ्या प्रमाणात गणरायाच्या मुर्ती तयार करणारे कारखाने आहेत. सहा महिन्यापूर्वीपासून मुर्तीचे काम सुरु असते. नांदेडमध्ये ४ फुटापासून ते १२ फुटापर्यंत मुर्ती तयार केल्या जातात. यंदा वाढत्या महागाईचा फटका गणरायाच्या मुर्तीना देखील बसला आहे.
२० टक्क्यांनी दर वाढ
मुर्ती तयार करण्यासाठी लागणारे पिओपी, काथ्या, फ्लोर सेंट कलर, रेनबो कलर, वेलवेट कलर, स्टोन, लेस आदि साहित्यामध्ये वाढ झाली आहे. तसेच मजूरी वाढल्याने मुर्त्यांच्या दरात २० टक्यांनी वाढ झाली आहे. शासनाने मूर्ती कारागिराना मदत करावी अशी मागणी न्यू गजेद्र मूर्ती सेंटरचे संचालक गजेद्र ठाकूर यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.