Water Crisis : डोक्यावर तीन-तीन हंडे घेऊन महिलांची पायपीट; थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ परिसरातील चित्र

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ परिसरातील पाण्यासाठी सुरू असलेली वणवण संपण्याची चिन्हे नाही. तोरणमाळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असते
Water Crisis
Toranmal Water CrisisSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदूरबार : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे भीषण पाणी टंचाईची (Water Crisis) समस्या निर्माण झाली आहे. पाण्यासाठी गावाचा चढाव उतरून महिला येथील यशवंत तलावात जात असून (Nandurbar) पाण्याने भरलेले हंडे भरून डोक्यावर घेत दोन किलोमीटर पायपीट करत आहेत. (Tajya Batmya)

Water Crisis
RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी नोंदणीस टाळाटाळ; ३२ शाळांना नोटीस

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ (Toranmal) परिसरातील पाण्यासाठी सुरू असलेली वणवण संपण्याची चिन्हे नाही. तोरणमाळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असते. अनियमित, तोकड्या पाणी पुरवठ्यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरत नाही. हेच येथील वास्तव आहे. यंदा ही परिस्थिती अधिक बिकट झाली असून महिलांना डोक्यावर तीन-तीन हंडे घेऊन दोन किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Water Crisis
Unseasonal Rain : चांदूरबाजार परिसरात गारपीटसह वादळी वाऱ्याचा पाऊस; गहू, कांद्याचे नुकसान

पर्यटनस्थळ म्हणून धडगाव तालुक्यातील तोरणमाळची ओळख आहे. येथील ग्रामपंचायतीमधील पाडे दुर्गम दऱ्याखोऱ्यात आहे. यशवंत तलाव जवळ असूनही येथील ग्रामस्थांचा जीव पाण्यासाठी तळमळतो. होळीपासून (Water Scarcity) पाणीटंचाई सुरू झाली की, सरकार टँकरने पाणीपुरवठा सुरू करते. मात्र एक- दोन दिवसांआड येणारे पाणी अपुरे पडते. गावाचा चढाव उतरून महिला डोक्यावर हंडे घेउन दोन किलोमीटर प्रवास करतात. पाणी टंचाई बाबत याकडे संबधित ग्रामपंचायत प्रशासनाकडे सांगूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com