तबरेज शेख
नाशिक : सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. वेगवेगळे आमिष दाखवून समोरच्याला बळी पाडले जात आहे. त्यानुसार शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळून देतो; असे आमिष दाखवून नाशिकमध्ये तिघांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सध्या सायबर भामट्यांकडून रोज नवनवीन पद्धतीने नागरिकांची फसवणूक केली जात आहे. यात प्रामुख्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष, विदेशातून महागडे गिफ्ट पाठविणे तसेच वेगवेगळे प्रलोभन दाखवून त्यातून समोरच्याची फसवणूक करण्यात येत आहे. अशाच प्रकारे नाशिकमध्ये देखील ऑनलाइन फसवणूकीची घटना समोर आली आहे. यात तीन जणांची फसवणूक करण्यात आली आहे.
४४ लाख रुपयात फसवणूक
शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळून देतो असे आमिष दाखवून ऑनलाइन व्यवहाराद्वारे ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. ऑनलाइन व्यवहारांमध्ये आर्थिक फसवणुकीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात विशेष म्हणजे टेक्नोसेवी असलेल्या वर्गाचे प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये तीन नागरिकांची ४४ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
सायबर पोलिसात गुन्हा दाखल
ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाने जवळपास ४४ लाख रुपयांची फसवणुकीचे प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.